कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या आयटीआयमधील आपत्कालीन कारागृहातून दोघा न्यायालयीन कैद्यांनी पलायन केल्यानंतर त्यांना दुचाकी व जेवण आदी मदत पुरवणाऱ्या त्यांच्या दोघा मित्रांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. ओंकार शिवाजी पाटील (वय २४, रा. बाबुरामनगर, कळंबा), संदीप तानाजी तहसीलदार (२९ रा. शिवाजी चौक, हातकणंगले) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच मदतीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी दुपारी हातकणंगले येथे शेतात पकडलेल्या प्रतीक सुहास सरनाईक (रा. आर.के. नगर, पाचगाव रोड) व गुंडाजी तानाजी नंदीवाले (रा. तमदलगे, ता. शिरोळ) या न्यायालयीन बंदींची बुधवारी पुन्हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
खून व दरोडा या गंभीर गुन्ह्यातील प्रतीक सरनाईक व गुंडाजी नंदीवाले या दोघा न्यायालयीन कैद्यांनी दि. १४ मे रोजी आपत्कालीन कारागृहातून पलायन केले होते. हातकणंगले येथे शेतात ते लपून बसलेले असताना बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पलायन कालावधीत कैद्यांना ओंकार पाटील व संदीप तहसीलदार यांनी मदत पुरवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ओंकारने दोघांना आपल्या दुचाकीवरून कळंबा येथून मुरगुडपर्यंत पोहचवले. तर संदीपने त्यांना हातकणंगले येथे वारंवार जेवण दिल्याचे दिसून आले. अटक केलेल्या संशयितांनी चुकीची माहिती देऊन तपास कामात पोलिसांची दिशाभूलही करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
फोटो नं. २६०५२०२१-कोल-ओंकार पाटील (आरोपी)
फोटो नं. २६०५२०२१-कोल-संदीप तहसीलदार (आरोपी)
===Photopath===
260521\26kol_2_26052021_5.jpg~260521\26kol_3_26052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २६०५२०२१-कोल-ओंकार पाटील (आरोपी)फोटो नं. २६०५२०२१-कोल-संदीप तहसीलदार (आरोपी)~फोटो नं. २६०५२०२१-कोल-ओंकार पाटील (आरोपी)फोटो नं. २६०५२०२१-कोल-संदीप तहसीलदार (आरोपी)