कोल्हापूर : चक्रीवादळामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. गगनबावड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत १२ तासांत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजारामसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी पावसाचा हवामान खात्याच्या इशाऱ्याने भीती कायम आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट् असे करत गुरुवारी मुंबईच्या दिशेने सरकले. त्यामुळे बुधवारी दिवसरात्र पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गुरुवारी पहाटेपर्यंत पावसाचा कहर सुरूच होता. सकाळपासून काहीसा जोर ओसरला तरी अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या तुडुंब भरुन वाहत असून जोर वाढल्यास पात्राबाहेर जाण्याचा धोका आहे.राधानगरी धरणाचे दोन दरवाजे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडले. ६ आणि ३ क्रमांकाच्या या दरवाजातून ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावतीच्या पात्रात होऊ लागला आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. बुधवारी संध्याकाळपर्यंत १० फुटांवर असणारी पातळी गुरुवारी सकाळी आठ वाजता १८ फुटांवर गेली. त्यामुळे पंचगंगेवरील राजारामसह सात बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली.गगनबावड्यात अतिवृष्टीगुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६७७ मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून १०८ मि.मी. पाऊस पर्जन्यमापकावर नोंदवला गेला आहे. करवीर ९२, पन्हाळा ८४. शिरोळ ८०, हातकणंगले ६०, शाहूवाडी ५३, कागल ४९, गडहिंग्लज व राधानगरीत ३५, आजरा २९, चंदगड २४, भुदरगड २१ मि.मी. असा पाऊस नोंदवला गेला आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टीधरणांच्या पाणलोट क्षेत्रातही प्रचंड पाउस झाला. कुंभ, कासारी, कोदे या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात अवघ्या कांही तासात ११५ ते १३० मि.मी. पाउस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळेच पंचगंगा खोऱ्यातील सर्व नद्यांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले: गगनबावड्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 6:47 PM
dam, rain, kolhapurnews चक्रीवादळामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. गगनबावड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत १२ तासांत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजारामसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी पावसाचा हवामान खात्याच्या इशाऱ्याने भीती कायम आहे.
ठळक मुद्देराधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले: गगनबावड्यात अतिवृष्टी पावसाचा जोर ओसरला तरी वादळाचा धोका कायम