अतुल आंबी
इचलकरंजी : शस्त्रास्त्राच्या धाकाने दहशत माजवून खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण, लुटमार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी याच्यासह अक्षय कोंडूगळे या दोघांनी पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी विष पिले. त्यामुळे खळबळ उडाली. त्याला तात्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल केल. त्यावेळी नातेवाईक व समर्थकांनी गोंधळ घातला. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व्यावसायिक सरदार मुजावर यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत 4 लाखाची रोकड व सोन्याचे दागिने असा 11.35 लाखाचा मुद्देमाल बळजबरी काढून घेत खंडणी मागितल्या प्रकरणी जर्मनी टोळीतील 15 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 31 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी आणि याच गुन्ह्यात नव्याने रविवारी अटक केलेला अक्षय कोंडूगळे या दोघांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यातच विषारी औषधं प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती समजताच पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या दोघांना तात्काळ आयजीएम रुग्णालयात हलवले. तेथे दोघासंस्थेचे नातेवाईक व समर्थक जमले. त्यांनी काही वेळ तेथे गोंधळ घातला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांनी भेट दिली. दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.