शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दोन आजी, एक माजी कोण मारणार 'बाजी'

By admin | Published: October 28, 2015 12:40 AM

'सुशिक्षितांचा प्रभाग’ अशी ओळख : नवख्या आणि तगड्या उमेदवारांचे तुल्यबळ आव्हान

कोल्हापूर : दोन विद्यमान नगरसेवक, एक माजी नगरसेवक, उद्योजक, कार्यकर्ता आणि अपक्ष यांच्यात प्रभाग क्रमांक ३९, राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. या प्रभागातून सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसकडून अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुरलीधर जाधव, भाजपचे विजय जाधव, शिवसेनेचे प्रदीप पोवार आणि जनार्दन कोरे, राजू पसारे, माधव सबनीस हे अपक्ष म्हणून लढत आहेत.हा प्रभाग ‘सर्वसाधारण’साठी खुला झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह अनेक दिग्गज या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करीत आहेत. त्याच प्रभागाशेजारील प्रभाग क्रमांक ३७ हा महिलांसाठी आरक्षित झाल्याने व त्यातील दिग्गजांनी या प्रभागाकडे मोर्चा वळविल्याने येथे आता प्रतिष्ठेची व दिग्गजांची लढत पाहण्यास मिळत आहे. ‘उच्चशिक्षित आणि सुशिक्षितांचा प्रभाग’ अशी ओळख असलेल्या ‘राजारामपुरी एक्स्टेंशन’मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजू पसारे निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यावर त्यांनी बंडखोरी करून ते अपक्ष म्हणून लढत आहेत. प्रभागात केलेली विकासकामे घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांना नाकारून काँग्रेसने अतुल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक असलेले अतुल पाटील हे आजवर विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यांच्या शिदोरीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विकासाच्या विविध योजना हा त्यांच्या प्रचारातील मुद्दा आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान नगरसेवक मुरलीधर जाधव हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा हक्काचा तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने, ते या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागासह शेजारील अन्य प्रभागांत केलेल्या विकासकामांचा आरसा दाखवत, विकासाची ग्वाही देत ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.दोन वेळा नेतृत्व केलेले माजी नगरसेवक प्रदीप पोवार हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या पत्नी सुषमा यांनी सुद्धा याच प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. महापालिकेतील तीन टर्मचा अनुभव, पूर्वीची विकासकामे यांच्या जोरावर ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या आजी-माजी नगरसेवकांना काँग्रेसच्या अतुल पाटील यांच्यासह भाजपच्या विजय जाधव यांनी आव्हान दिले आहे. जाधव हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या प्रभागात त्यांनी अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. हा पाठपुरावा आणि पालकमंत्री पाटील यांच्या फंडातून केलेली विकासकामे घेऊन ते मतदारांना साद घालत आहेत. माधव सबनीस आणि जनार्दन कोरे हे अपक्ष म्हणून लढत आहेत. एकंदरीत पाहता या सप्तरंगी लढतीत आजी-माजी नगरसेवकांना नवख्या अन् तगड्या उमेदवारांनी आव्हान दिले आहे. ( प्रतिनिधी )उमेदवारांचा कस लागणार‘उच्चशिक्षित व सुशिक्षित प्रभाग’ असल्याने या ठिकाणी आर्थिक प्रलोभनांना बळी पडणारे मतदार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्ष, उमेदवार, त्याचे चारित्र्य आणि काम करण्याची क्षमता यांचा विचार मतदार करणार आहेत. त्यामुळे प्रचारात उमेदवारांचा कस लागत आहे. प्रभागात एकूण ५२०० मतदारसंख्या आहे. यात मराठा समाज सर्वाधिक २६९१, ब्राह्मण समाज ११६५, सिंधी ७५, लिंगायत १६०, जैन १४१, दाक्षिणात्य ४१, साळी ४१, मारवाडी १७०, गुजराती २८, मागासवर्गीय २५४, मुस्लिम १४९, धनगर १९, ख्रिश्चन ८, बंगाली ३, उत्तर भारतीय १४, शिंपी २८, नाभिक १७, सुतार २१, सोनार १४, उर्वरित १५० असे साधारणत: मतदार आहेत.