शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:18 AM

कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देमहापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छताआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची माहिती

कोल्हापूर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.महानगरपालिकेच्या कोणत्याही मोहिमेवर लोकांचा विश्वास बसायचा असेल आणि या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आधी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यात भाग घेऊन मोहीम राबविली पाहिजे. म्हणूनच शहराच्या स्वच्छतेची सुरुवात आधी स्वत:पासून करायला हवी. याकरिता १५ दिवसांतून एकदा दैनंदिन कामातील फक्त दोन तास स्वत:चे कार्यालय व त्याच्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे.

मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय,अग्निशामक स्थानक, रुग्णालये, कार्यशाळा येथील कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करायची आहे, असे आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता कधी केली आणि पुढे कोणत्या दिवशी करायची आहे, याचे रेकॉर्ड संबंधित विभागाने ठेवायचे आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.दैनंदिन कचरा उठाव करताना कचऱ्यांचे वर्गीकरण अधिक चांगल्या पद्धतीने करावे, अधिकाºयांनी सतत दक्ष राहून काम करावे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, सोसायटी, गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करावे, अशा सूचनासुद्धा आयुक्त कलशेट्टी यांनी केल्या.शहरात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करावी. ज्या ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या तयार केल्या जातात, त्याच ठिकाणी प्रथम कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.‘स्वच्छता अ‍ॅप’चा प्रसार करावास्वच्छ भारत अभियान’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’ला शहर परिसरातील १८ हजार नागरिक जोडले गेले आहेत; परंतु ही संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिक या अ‍ॅपशी जोडले जावेत यासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त तक्रारी या अ‍ॅपवर याव्यात याकडे लक्ष द्या, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सुचविले. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर