कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदविण्यात आले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,७३५ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी रुग्णसंख्या निम्म्यावर आली होती. ती शुक्रवारी वाढल्याने लोकांच्या छातीत पुन्हा धस्स झाले.
या २७७ नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १३७ जणांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील ५१ आणि अन्य जिल्ह्यांतील १८ जणांचा समावेश आहे. आजरा तालुक्यात २, भुदरगड ६, चंदगड ४, गगनबावडा १, हातकणंगले १४, करवीर १७, पन्हाळा ६, राधानगरी २, शाहूवाडी ३, शिरोळ १६, अशी अन्य तालुक्यांतील कोरोनाग्रस्तांची दिवसभरातील आकडेवारी आहे. गडहिंग्लज व कागल तालुक्यांत मात्र नवा एकही रुग्ण सापडला नाही.
दिवसभरामध्ये ९६८ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २,३५७ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २८६ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे.
चौकट
सर्वांत जास्त रुग्ण कोल्हापूर शहर : १३७
सर्वांत कमी रुग्ण गडहिंग्लज, कागल : ००
आजरा व राधानगरी : प्रत्येकी २
गगनबावडा : १