शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कोमलच्या श्वासासाठी जीव तोडून नाचणार दोनशे कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2017 11:23 PM

कोमलच्या श्वासासाठी जीव तोडून नाचणार दोनशे कलाकार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्याची लेक कोमल गोडसे हिचा एक वर्षांपासून चेन्नईच्या रुग्णालयात जगण्यासाठी लढा सुरू आहे. या लढ्यात यशही येत आहे. प्रत्यारोपणासाठी हृदय आणि फुप्फुस उपलब्ध झाले परंतु, केवळ पैशांअभावी इलाज थांबलेत. कोमल हिच्या श्वासासाठी खारीचा वाटा उचलता यावा यासाठी साताऱ्यातील अठरा डान्स अ‍ॅकॅडमींनी एकत्र येत मंगळवारी चॅरिटी शो आयोजित केला आहे. यातून सुमारे अडीचशे कलाकार थिरकणार आहेत. साताऱ्यातील कोमल पवार हिचा दीड वर्षांपूर्वी फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज विलास गोडसे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या एक वर्षांतच ती आजारी पडली. तिच्यावर सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर येथे उपचार करण्यात आले. मात्र, आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्याने डॉक्टरांनी हृदय आणि फुफूस प्रत्यारोपन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तिच्यावर सध्या चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रियेसाठी केवळ दवाखान्याचा खर्च ३५ लाख तर एकूण खर्च ५४ लाखांच्या घरात जाणार आहे. हा खर्च कसा करायचा या चिंतेत कोमलचे नातेवाईक आहेत. कोमल पवार यांचा भाऊ कुलदिप पवार हा फुटबॉल खेळाडू असला तरी तो एक चांगला नृत्य कलाकार आहे. त्यातून त्याचे साताऱ्यातील नृत्यक्षेत्राशी चांगले संबंध आहेत. ‘कुलदिपची दिदी ही आपली दिदी आहे. कोमल दिदी मृत्यूशी झुंज देत असताना तिच्यासाठी काही तरी करायलाच हवे, हा अक्षय सावंत यांच्या डोक्यात घोळत होता. त्यांच्या भावना सहकारी मित्रांसमोर व्यक्त केली अन् त्यातून ‘मेघा चॅरिटी शो २०१७’ ही संकल्पना पुढे आली.साताऱ्यातील शाहू कला मंदिरमध्ये मंगळवार, दि. ६ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी साताऱ्यातील सर्वच्या सर्व डान्स अ‍ॅकॅडमी प्रथमच एकत्र येत आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक अ‍ॅकॅडमी स्वत:ची कला सादर करणार असून सरासरी दोनशे ते अडीचशे कलाकार यात सहभागी होत आहेत. तसेच नामवंत गुरुवर्य उपस्थित राहणार आहेत.यासाठी नाममात्र शुल्क ठेवले असून यातून जमा होणारी संपूर्ण रक्कम कोमल यांच्या उपचारासाठी दिली जाणार आहे. अवयव उपलब्ध... हवीय मदतकोमल यांचे पती धीरज गोडसे यांच्या संपर्कात कुलदीप व त्याचे मित्र आहेत. चेन्नईतूनच कोमलसाठी फुप्फुस व हृदय उपलब्ध झाल्याची गोड बातमी चेन्नईहून मिळाली आहे. आता केवळ खर्चासाठी पैसा उपलब्ध झाला की तो बसविण्यात येणार आहे. कोमल यांच्या या लढाईत सातारकरांच्या मदतीची गरज आहे. येथेही करू शकता मदतकोमल यांच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी रवींद्रनाथ जीई असोसिएशनच्या एचडीएफसी बँकेच्या ०५, सबरी सलाई, मदीपखाम, चेन्नई शाखेच्या चालू खाते क्रमांक ०१११२०९०००००४४ या खात्यावर जमा करण्याचे आवाहन केले आहे.या अ‍ॅकॅडमी सहभागीएबीसीडी डान्स स्टुडिओ सातारा, अ‍ॅक्टीव्ह फ्लिपरस सातारा, मल्हार आॅरिअर्स, सातारा, पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी, सातारा, आकाश कला अ‍ॅकॅडमी, सातारा, ब्लॅक बॉईज् ग्रुप, सातारा, अपहोल्ड गु्रुप सातारा, फाईट क्लब सातारा, डान्स व्हिजन गु्रप सातारा, जायदेव भालेराव अ‍ॅकॅडमी, सातारा, नित्य साधना अ‍ॅकॅडमी, सातारा, बालगणेश कलामंच सातारा, के. जी. ग्रुप, सातारा, डी व्हारस गु्रुप सातारा, डी२डी गु्रप सातारा, टीम आय गु्रप कऱ्हाड हे संघ सहभागी होणार आहेत.