शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

वाड्यावस्त्यामधील दोनशे विद्यार्थ्यांनी प्रथमच पाहिला 'न्यू पॅलेस'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 5:52 PM

आपले गाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या या शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रथमच शाहूराजांचा राजवाडा न्यू पॅलेसही पाहिला.

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आठ वाड्यांमधील सुमारे आठ शाळांमधील दोनशे शाळकरी विद्यार्थ्यांनी येथील शाहू स्मारक भवन येथे ‘गॉड मस्ट बी क्रेझी-२’ या बालचित्रपटाचा आनंद घेतला. आपले गाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या या शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रथमच शाहूराजांचा राजवाडा न्यू पॅलेसही पाहिला.यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवा दिग्दर्शक उमेश बगाडे म्हणाले,  चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी भागात आणि वाड्यावस्त्यांत असलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना तेथे जाऊन विविध बालचित्रपट दाखवले. आज या वाड्यावस्त्यांतील शाळांमधील विद्यार्थी कोल्हापुरात आले, हे मला आनंदाचे वाटते. तुम्ही गोष्टी सांगायला, लिहायला शिका. त्याआधी पुस्तकं वाचा, माणसं वाचा, निसर्ग वाचा. माणूस म्हणून, कला म्हणून समृद्ध व्हा. सिनेमा हे मोठं माध्यम आहे. मात्र, आपण वेचून चित्रपट पहा, ऐका. माणूस बनविणारे पौष्टिक चित्रपट पहा, असे आवाहन बगाडे यांनी केले.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राधानगरी, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यांतील वाड्यावस्तीतील सुमारे सात शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करण्यासाठी चिल्लर पार्टीमार्फत तीन हजार रुपयांची पुस्तके आणि त्या शाळेतील मुलांना कपडे देण्यात आले. अध्यक्षस्थानी शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे होते. यावेळी कोल्हापुरातील मल्हार जाधव या शालेय विद्यार्थ्याने लिहिलेल्या आणि त्यानेच चित्रे काढलेल्या ‘मल्हारच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केक कापून दहावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी भुदरगड तालुक्यातील पंडिवरे विद्यामंदिरचे शिक्षक दिलीप मालंडकर, राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी विद्यामंदिरचे शिक्षक राजाराम रायकर, जाधववाडी विद्यामंंदिरचे शिक्षक रवींद्र बोडके, पिलावरवाडी विद्यामंदिरचे शिक्षक सुहास पाटील, शाहूवाडी तालुक्यातील येळवंडे विद्यामंदिरचे शिक्षक आनंदा काशीद, गौळवाडा विद्यामंदिरचे शिक्षक मारुती राठवड, सावर्डी भैरी धनगरवाडा विद्यामंदिरचे शिक्षक अमोल काळे, गोविंद पाटील, अवनी संस्थेचे शिक्षक शिंदे, कोल्हापुरातील सुधाकर जोशी झोपडपट्टीतील विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना ‘सिनेमा पोरांचा’ हे चिल्लर पार्टीचे पुस्तक भेट देण्यात आले.बबन बामणे, ओंकार कांबळे, धनश्याम शिंदे, अर्शद महालकरी, अभिजीत कांबळे, अनिल काजवे, विजय शिंदे, सचिन पाटील, सुधाकर सावंत, महेश नेर्लीकर, मिलिंद कोपार्डेकर, अभय बकरे, मिलिंद नाईक, नसीम यादव, अनुजा बकरे, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख, सलीम महालकरी, भाऊ पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

पाणी बचतीची घेतली शपथशाहूवाडी तालुक्यातील सावर्डी भैरीचा धनगरवाडा येथे शिकणाऱ्या मुलांना रोज दोन ते चार किलोमीटर चालत जाऊन घरात पाणी आणावे लागते. त्यांचे कष्ट सांगून मिलिंद यादव यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले. यानिमित्ताने पाणी बचतीचे महत्त्व सांगून पाणी बचतीची शपथ घेण्यात आली. बालचित्रपट दाखविण्यापूर्वी पाणी बचतीचा संदेश देणारा लघुपट दाखविण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर