राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री सन्मान’ योजनेच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात दोन लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना दोन हजारांचा पहिला हप्ताही मिळाला नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. आतापर्यंत दोन लाख १६ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर केवळ ८६ हजार शेतकºयांना दोन्ही हप्ते प्राप्त झालेले आहेत. निकषाप्रमाणे सप्टेंबरअखेर दोन हप्ते देय लागतात.केंद्र सरकारने देशातील शेतकºयांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान’ योजना फेबु्रवारी २०१९ मध्ये जाहीर केली. सरकारी नोकरदार व सरकारी पेन्शनधारकांना योजनेचा लाभ होणार नाही. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम देऊन जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी, तालुका स्तरावर प्रांताधिकारी, गावस्तरावर तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. पात्र शेतकºयांना चार महिन्याला दोन हजार रुपये असे चार हप्त्यांत सहा हजार रुपये शेतकºयांच्या खात्यावर केंद्र सरकार वर्ग करणार आहे. या योजनेसाठी फेबु्रवारी महिन्यात शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्णात चार लाख ७६ हजार खातेदार शेतकºयांनी ‘प्रधानमंत्री सन्मान’ योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन लाख ९० हजार शेतकरी पात्र ठरले. उर्वरित शेतकºयांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते अपात्र ठरविण्यात आले. फेबु्रवारी ते मे या चार महिन्यांत दोन हजारांचा पहिला हप्ता, तर सप्टेंबरअखेर दुसरा हप्ता शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते.आतापर्यंत दोन लाख १६ हजार शेतकºयांना पहिला हप्ता मिळाला आहे, तर ८६ हजार शेतकºयांच्या खात्यावर दोन्ही हप्ते (चार हजार) जमा झाले आहेत.सप्टेंबरअखेर सर्व शेतकºयांना लाभ?लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने ही लोकप्रिय घोषणा करून घाईगडबडीने थोड्या शेतकºयांच्या खात्यावर पहिला हप्ता वर्ग केला; पण त्यानंतर पैसे येण्याचा वेग मंदावला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे सप्टेंबरअखेर सर्वच शेतकºयांच्या खात्यावर दोन्ही हप्ते जमा करण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर गतिमान झाल्या आहेत.
दोन लाख शेतकरी ‘प्रधानमंत्री सन्मान’च्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:49 AM