शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

दोन लाखांचा रोज फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : चंदगड एस. टी. आगारात वाहक ४३, चालक ३६, यांत्रिक कर्मचारी १७, लेखनिक ११ आदी १३० कमी कर्मचारी, तालुक्यात सुरू असलेली अवैध वाहतूक. चंदगड आगाराकडे वरिष्ठ कार्यालयाचे झालेले दुर्लक्ष व आगारातील रिक्त पदे भरण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी यांनी केलेली डोळेझाक. या सर्वांचाच परिणाम म्हणून चंदगड एस. टी. आगाराला ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : चंदगड एस. टी. आगारात वाहक ४३, चालक ३६, यांत्रिक कर्मचारी १७, लेखनिक ११ आदी १३० कमी कर्मचारी, तालुक्यात सुरू असलेली अवैध वाहतूक. चंदगड आगाराकडे वरिष्ठ कार्यालयाचे झालेले दुर्लक्ष व आगारातील रिक्त पदे भरण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी यांनी केलेली डोळेझाक. या सर्वांचाच परिणाम म्हणून चंदगड एस. टी. आगाराला रोज दोन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.वरिष्ठ कार्यालयाच्या १७ जुलै २०१७च्या आदेशानुसार चंदगड आगारातील ४५ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये २१ वाहक, १६ चालक, ४ लेखनिक, ३ यांत्रिक कर्मचारी व इतर २ यांचा समावेश आहे. त्याबदल्यात अद्याप एकही कर्मचारी वरिष्ठ कार्यालयाकडून चंदगड आगाराकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे १२ उत्पन्न देणाºया फेºया रद्द कराव्या लागल्या आहेत.वर्षभरापूर्वी चंदगड आगारकडे पूर्ण कर्मचारीवर्ग होता. त्यावेळी गळक्या, जुन्या गाड्या घेऊनच पुणे विभागात उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल क्रमांक मिळविला होता. मात्र, अलीकडे विविध संघटनांनी प्रवासी व विद्यार्थी यांच्या सेवेसाठी सुरू करायला लावलेल्या नवीन बसफेरीमुळे १५ उत्पन्न देणाºया बसफेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. कोल्हापूरला जाण्यासाठी दोन-दोन तास गाड्या नाहीत.प्रवासी, विद्यार्थी यांच्या चंदगड आगाराबाबत तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारीची दखल घेऊन कर्मचारी भरण्याबाबत परिवहन मंत्री यांना जाब विचारणारा प्रतिनिधी तालुक्यात नसल्याची चर्चा सुरू आहे. परिवहन मंत्री यांनी चंदगडमधून बदली केलेल्या ४०-५० कर्मचाºयांची त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात सोय केली. त्या बदल्यात एकही कर्मचारी दिलेला नाही.कोकण व पुणे विभागातून चंदगडला बदली झालेले कर्मचारी चंदगड आगारात हजर न होता जिल्हा कार्यालयातील अधिकाºयांना हाताशी धरून आपल्या जवळच्या व सोयीच्या ठिकाणी बदली करून घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये चंदगड आगाराला दररोज दोन लाखांचा तोटा सहन करावा लगत आहे. त्यामुळे कर्मचाºयांचा पगार भागविण्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून काही रक्कम मागवून घ्यावी लागत आहे.आगार चालविणे कठीण१ चंदगड आगारातील चालक व वाहक तसेच इतर कर्मचाºयांची संख्या अत्यंत कमी असल्याने आगार चालविणे कठीण झाले आहे. तालुक्यातील राजकीय प्रतिनिधी कधीच एस.टी.ने प्रवास केलेले सहसा पहावयास मिळत नाही. नेतेमंडळींना एस.टी चालू किंवा बंदचा फरक पडत नाही. त्यामुळे चंदगड आगारातील निर्माण झालेल्या प्रश्नांचे त्यांना सोयरसूतक नाही? लांबपल्ल्याच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत, तर आगारातील निम्या बसेस अन्य आगाराकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.२ जिल्ह्यातील उर्वरित ११ आगारातील सेवा ज्येष्ठतेनुसार एक कर्मचारी असे एकूण ११ कर्मचारी सुरुवातीला दिले जाणार असल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, हे कर्मचारी पाठविण्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. प्रत्येक आगारातील सेवा ज्येष्ठतेनुसार एका कर्मचाºयाऐवजी ३ कर्मचारी दिल्यास चंदगड आगाराला वाचविता येईल. तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लक्ष घालून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून चंदगड आगाराबाबत निर्माण झालेल्या या समस्येवर तत्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे.