शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 10:40 PM

२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.

ठळक मुद्देखासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : रामायण, महाभारत मालिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे पाच एप्रिलपर्यंत बंद होणार आहेत. त्यामध्ये सांगली, पंढरपूरसह महाराष्टतील २१ केंद्रांचा समावेश आहे.

देशात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर त्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संचाला काड्यांचा अ‍ॅन्टेना जोडावा लागत असे. डिजीटल युग येईपर्यंत घराघरांवर असा अ‍ॅन्टेना दिसत होता. सध्या अपवादात्मक कुठेतरी ते दिसतात. खासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले. काड्यांच्या अ‍ॅन्टेनाची जागा डिश अ‍ॅन्टेना आणि केबलने घेतली. तंत्रज्ञान बदलले तसे दूरदर्शनच्या अ‍ॅनालॉग टेरेस्टेरीयल ट्रान्समिशन (स्थानिक प्रक्षेपण केंद्र)चे महत्त्व कमी होऊ लागल्याने, तसेच ही यंत्रणा कालबाह्य ठरू लागल्याने टप्प्याटप्प्याने ती बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अर्थात प्रसार भारतीने घेतला.

२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.

कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेणारदूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे बंद होत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार आहे; मात्र त्यासाठी बदली होईल त्या ठिकाणी जाणे भाग आहे. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाºयांना हे कठीण वाटत आहे. नव्या ठिकाणी आपले कसे जमायचे, या विचाराने ते अस्वस्थ आहेत.ही केंद्रे होणार बंद : अकलूज, बदलापूर, चिखली, हिंगणघाट, खामगाव, खोपोली, किनवट, महाड, म्हासळे, मोर्शी, पंढरपूर, परभणी, पुसद, संगमनेर, सांगली, शहादा, शिर्डी, शिरपूर, तुमसर, उमरगा, उमरखेड.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर