कोल्हापूर : राजारामपुरीतील वेगवेगळ्या दोन रुग्णालयांत उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांकडील सोन्याचे दागिने व वस्तू चोरणा-या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. आरती महादेव गायकवाड (वय २२, रा. नवश्या मारुती मंदिरनजीक, शाहूनगर, राजारामपुरी) व संतोष नारायण जाधव (३२ रा. इचलकरंजी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, या दोघांकडून सुमारे १ लाख १० हजाराचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात ऋतुजा बाबासाहेब बावचे (वय १९, रा. हुपरी, ता. हातकणंगले) ह्या उपचार घेण्यासाठी ॲडमिट होत्या, त्यांनी आपली पर्स टेबलावर ठेवली होती. त्या पर्समध्ये त्यांच्या गळ्यातील सोन्याची पाच ग्रॅमची सुमारे २० हजारांची चेन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास केली. त्याबाबत पोलिसांनी संशयावरुन आरती गायकवाड या महिलेस अटक केली, त्यांच्याकडून चोरीची चेन व गणपतीची चांदीची मूर्ती असा सुमारे ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दुस-या घटनेत राजारामपुरी तिस-या गल्लीतील एका इंडोसरिन सेंटरमध्ये उपचाराकरीता आलेल्या वंदना पाटील (रा. शिंगणापूर, ता. करवीर) यांची सुमारे ४५ हजारांचे सोन्याचे दागिने असणारी पर्स अज्ञाताने लांबली होती, त्याप्रकरणी पोलिसांनी संतोष नारायण जाधव याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले.
दोन्हीही रुग्णालयातील चोरीप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावरून पोलिसांनी दोन्हीही घटनेतील चोरट्यांना स्वतंत्रपणे अटक करून त्यांच्याकडून एकूण १ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पो. नि. सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली.
फोटो नं. ११०७२०२१-कोल-संतोष जाधव (आरोपी)
110721\11kol_1_11072021_5.jpg
फोटो नं. ११०७२०२१-कोल-संतोष जाधव (आरोपी)