कुडूत्री (ता. राधानगरी) येथे आरोग्य विभागाच्यावतीने आज सोमवारी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ८१ पैकी दोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या.यापूर्वी गावामध्ये कोरोनाने बाप लेकाचा मृत्यू झाल्याने आज आढळलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांना तत्काळ राधानगरी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच महत्त्वाच्या गावात रॅपिड अँटिजन टेस्ट मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये दूध संस्था, रेशन धान्य दुकान, किराणा दुकान, कामगार, मजूर व गर्दीची ठिकाणे असलेल्या गावात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
दरम्यान कुडूत्री येथे आजच्या मोहिमेत ८१ जणांची अँटिजन टेस्ट घेण्यात आली, यामध्ये दोन नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.यापूर्वी कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने गावात सावधानता बाळगण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.