पेठवडगाव/सुहास जाधव
किणी (ता हातकणंगले )येथील पथकर नाक्यावर त्यांच्या दोन कर्मचाऱ्यानी मुजोरी केल्यांचे सामोरे आले आहे. निवडणुक कामाच्या पथकाला पथकरासाठी थांबून ठेवले. तसेच एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. यावेळी या गाडीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल व पाच अधिकारी होते.त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणल्या बद्दल दोन पथकर दोन कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे खळबळ माजली आहे. हा प्रकार काल सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला होता.
याप्रकरणी विजय शामराव शेवडे (रा.घुणकी) यास अटक करण्यात आली असून त्यांचा सहकारी फरारी आहे. फिर्याद जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल केशव कदम यांनी दिली आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: काल सोमवारी ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल व इतर अधिकारी इस्लामपूर हून निवडणुकीचे काम पाहून परत कार (एमएच ०१ बीटी ९०३२) ने कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान किणी पथकर नाक्यावर लेन क्रमांक सात वरून जात असताना अधिकार्यानी शासकीय ओळखपत्र दाखवून सोडण्याची विनंती केली. मात्र येथील कर्मचारी विजय शेवडे व त्यांचा अज्ञात सहाकारी यांनी राहूल कदम यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी असलेले वाहन अडवून ठेवले. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेवडे यास अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस नाईक संदीप पावलेकर करीत आहेत.