शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

ट्रकसह खतांची पोती घेऊन पोबारा केलेले दोघे अटक, दोन दिवसांत लागला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:19 AM

खतांची ४०० पोती घेऊन ट्रकसह पसार झालेल्या फसवणूक प्रकरणाचा शाहुपूरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला. पोलिसांनी केज (जि. बीड) येथून नटराज रामहरी धस (वय ३२) याला, तसेच मदत करणारा गुणवंत त्रंबक नाईकनवरे (दोघेही रा. इकुरा, ता. केज) यांना अटक केली.

ठळक मुद्देकेज येथे जाऊन शाहूपुरीच्या पथकाची कारवाईट्रकसह चोरीचा मुद्देमाल, ६० हजारांची रोकड जप्त

कोल्हापूर : खतांची ४०० पोती घेऊन ट्रकसह पसार झालेल्या फसवणूक प्रकरणाचा शाहुपूरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला. पोलिसांनी केज (जि. बीड) येथून नटराज रामहरी धस (वय ३२) याला, तसेच मदत करणारा गुणवंत त्रंबक नाईकनवरे (दोघेही रा. इकुरा, ता. केज) यांना अटक केली. त्यांच्याकडून साठ हजार रुपये, चोरीची ४०० खतांची पोती व ट्रक जप्त केले. ग्राहक संस्थेला पोहोचविण्यासाठी दिलेली खतांची पोती आणि ट्रक घेऊन चालक पसार झाला होता.खेबवडे (ता. करवीर) येथील अक्षय कृष्णात जाधव यांचा ट्रक व्यवसाय आहे. दि. १३ फेब्रुवारीला श्री साई समर्थ ट्रान्स्पोर्ट (मार्केट यार्ड, कोल्हापूर)मधून चार लाख १३ हजार ९३० रुपये किमतीची खतांची पोती भरून ट्रक गुडाळ (ता. राधानगरी) येथील लक्ष्मीनारायण कृषी सेवा केंद्र आणि श्री गुडेश्वर ग्राहक संस्थेकडे पाठवला; पण ट्रक पोहोच न होता तो चालक नटराज धस व गुणवंत नाईकनवरे यांनी परस्पर सांगली येथे नेला. तेथे त्यातील खतांची ४०० पोती दुसऱ्या ट्रकमध्ये भरून पोबारा केला.

दरम्यान, शाहुपूरी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल झाली. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी माहिती घेऊन सहायक फौजदार प्रकाश भंडारे, युवराज पाटील, प्रशांत घोलप, दिग्विजय चौगुले यांचे पथक केज येथे रवाना केले. तेथे संशयित नटराज धस व गुणवंत नाईकनवरे यांना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजारांची रोकड, तसेच चोरीला गेलेली खताच्या ४०० पोत्यांसह ट्रक जप्त केला.बनवाबनवी झाली उघडगुंडाळला ग्राहक संस्थेकडे पाठवलेला खतांचा ट्रक दुसऱ्या दिवशी न पोहोचल्याने ट्रकमालक जाधव यांनी चालक धस याला फोन केला, त्याने आपण रस्ता चुकलो, मी अडचणीत आहे, अशी बनवाबनवीची उत्तरे देऊन बनाव केला. काही वेळाने त्याने मोबाइल बंद केला. त्याचवेळी फसवणुकीचा प्रकार उघड झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर