कोल्हापूर : करवीर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने गुरुवारी सापळा रचून परिख पुलाजवळ दुचाकी चोरट्यास अटक केली. मारुती गुंडू मस्कर (वय ५४ रा. उचगाव, ता. करवीर. मूळ गाव- मोरेवाडी, ता. चंदगड) असे अटक केलेल्या संशयित दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करवीर उपाधीक्षक कार्यालयाकडील पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुरुवारी शहरातील परिख पुलानजीक रस्त्याकडेला एक बेवारस दुचाकी आढळली. संबंधित दुचाकी नेण्यासाठी कोणी येतो का हे पाहत पोलिसांनी तेथे सापळा रचला. त्यावेळी संशयित आरोपी मारुती मस्कर हा तेथे दुचाकी नेण्यासाठी आला असता त्यांला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही दुचाकी दि. २८ जूनला कांडगाव (ता. करवीर) येथून चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या पोलीस पथकाने केली. संशयिताकडून पोलिसांनी हस्तगत केलेली दुचाकी शुभम संभाजी माने (वय २३ रा. कांडगाव रोड, कोल्हापूर) याच्या मालकीची असून त्यांनी दुचाकी चोरीची तक्रार यापूर्वीच करवीर पोलीस ठाण्यात दिली होती.
फोटो नं. ०१०७२०२१-कोल-मारुती मस्कर (आरोपी-चोरी)
010721\01kol_9_01072021_5.jpg
फोटो नं. ०१०७२०२१-कोल-मारुती मस्कर (आरोपी-चोरी)