कोल्हापूर : शाळेची फी न भरल्यामुळे ऑनलाइन अध्ययनासाठी लिंकच न पाठवण्याचे प्रकार कोल्हापूरमध्ये घडत आहेत. संबंधित शाळांवर कडक कारवाई झाली नाही तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे.
दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु लॉकडाऊन आणि अन्य कारणांमुळे अनेक पालकांना पाल्याची फी भरणे शक्य झालेले नाही. अशा पालकांना फोन करून ‘फी’साठी तगादा लावला जात आहे. ज्यांनी त्यानंतरही फी भरलेली नाही, त्यांना शाळेकडून ऑनलाइन शिक्षणाची लिंकच पाठवली जात नसल्याच्या पालकांच्या तक्रारी असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी या वेळी सांगितले.
या वेळी समिना बागवान, शीतल कालगोटे, शेखर बारटक्के, वैभव जाधव, कुणाल शिंदे, मंगेश चितारे, शुभम मोरे उपस्थित होते.
१६०६२०२१ कोल युवासेना ०१
‘फी’साठी आग्रह धरणाऱ्या शाळांविरोधात युवासेनेच्यावतीने बुधवारी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.