यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भादाेलेची लोकसंख्या अठरा हजार आहे. येथून टोप ते दिघंची राज्यमार्गाचे काम सुरू आहे. भादोलेतून जाणारा रस्ता हा गावाच्या लोकवस्तीतून जातो. या रस्त्यालगत ग्रामपंचायत, शाळा, हायस्कूल, आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा विभाग, मंदिर, शेतकरी संस्था, बँका, दूध संस्था आहेत. गावातील मूलभूत सुविधा रस्त्यालगत आहेेत. या कामानिमित्त गावातील लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. या रस्त्याला सात रस्ते क्रॉस झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी एकाचा अपघातात दुर्दैवी बळी जातो. अशा घटना घडू नये म्हणून ग्रामस्थांची सुरक्षितता व सोयीसाठी रस्ता दुभाजक तसेच रस्त्याकडेला फुटपाथ ,गटर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरपंच आनंदा कोळी, युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सचिन पाटील, तानाजी पाटील, संभाजीराव घोरपडे, दीपक पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, समीर सनदे, शहाजी घोलप, डॉ. आनंदराव सुतार, आदी उपस्थित होते.
भादोल्यात लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:22 AM