साळवण: तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत व महागाई विरोधात केंद्र सरकारला जागे करण्यासाठी गगनबावडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण गगनबावडा येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.
तीन कृषी कायदे हे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. या कायद्यामुळे शेतीमालाला मिळणारा हमीभाव व शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असून खासगी व्यापारी व उद्योजकांना शेतकऱ्यांची खुली लूट करण्याची मुभा मिळणार असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, पंचायत समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग भोसले,बायजी शेळके, सूर्यकांत पडवळ, प्रकाश मेगाणे, संभाजी पाटील, अविनाश भांबुरे, विशाल पडवळ, संजय कांबळे, केरबा चोकेकर, सरदार मुलाणी, विश्वास भुतल, शामराव हंकारे,आत्माराम गवळी व कृष्णात चाबूक उपस्थित होते.