शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

उद्धव-चंद्रकांतदादांमध्ये घडला शब्दांविना संवाद

By admin | Published: March 04, 2017 12:58 AM

दुरावा कायम : बेळगावमध्ये नजरानजर

कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरचा मुक्काम रद्द करून मुंबईला जाण्यासाठी बेळगावला निघाले. तेथून ते विमानाने मुंबईला जाणार होते. गाड्या सुसाट बेळगावच्या विमानतळावर आल्या. गाडीतून उद्धव ठाकरे खाली उतरले तर समोर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. ‘कसं काय, कुठून आलात.’ बाकी चर्चा न करता ठाकरे विमानतळावर गेले आणि चंद्रकांतदादा कोल्हापूरकडे येण्यासाठी रवाना झाले. दोघांमधील ‘शब्दां’विना संवादाची चर्चा शुक्रवारी कोल्हापुरात सुरू होती. ठाकरे गुरुवारी विवाह समारंभासाठी आले होते. ते मुक्कामही करणार होते. मात्र, नियोजनात बदल होऊन त्यांनी रात्रीच मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे कोल्हापूरला उतरलेले विमानही बेळगावला गेले होते. विवाह समारंभानंतर ठाकरे थेट बेळगावला जायला निघाले. गाड्या बेळगाव विमानतळावर येताच अचानक समोर चंद्रकांतदादा पाटील दिसले. मात्र, एकमेकांची मिनिटभर चौकशी करून ठाकरे आत गेले तर पाटील बाहेर पडले.इकडे शुक्रवारी दिवसभर ठाकरे यांनी चंद्रकांतदादांना टाळल्याची चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या सत्तेचा तिढा सुटला नसताना या दोघांमध्ये कोल्हापूरमध्ये काही चर्चा होईल असे वाटत असतानाच ठाकरे यांचा मुक्काम रद्द झाल्याने ‘भेट झाली मात्र चर्चा नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजप-सेना युती २०० टक्के होणारबेळगाव विमानतळावर शुक्रवारी रात्री उद्धव आणि आमची भेट झाली. अतिशय चांगल्या वातावरणात आम्ही एकमेकांची चौकशी केली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांनी मला टाळल्याच्या चर्चेत काही तथ्य नाही. इतकेच नव्हे तर मुंबईत भाजप-शिवसेनेची २०० टक्के युती होणार याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला.