कोल्हापूर- उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा सोडून दिला असून आता त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा वारसा चालवावा, असा उपरोधिक सल्ला शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपल्यानंतर केसरकर पत्रकारांशी बोलत होते. मला एक दिवस पंतप्रधान करा, ३७० कलम रद्द करतो, असं सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा उद्धव ठाकरे यांनी सोडून दिला आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, वंचित बहुजन आघाडीचा वारसाही चालवायचा असेल, तर तो चालवावा. कारण त्यांच्याकडे आता दुसरे काही नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.