शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव यांनी कोरोनाशी लढावे; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 3:29 PM

सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

ठळक मुद्देपंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव यांनी कोरोनाशी लढावे : देवेंद्र फडणवीसजिल्ह्यातील कोरोना स्थितीचा घेतला आढावा

कोल्हापूर : सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी दुपारी कोल्हापूरच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना स्थितीची माहिती दिली. त्यानंतर दुपारी सीपीआर रुग्णालयाच्या कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापुरात ऑक्सीजन बेड वाढविण्याची गरज असल्याने यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांशी आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर भाजपचे अध्यक्ष राहुल चिकोडे त्यांच्यासमवेत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या जिल्ह्यांत भेटी देऊन तेथील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच तेथील त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आज सातारा,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. कोरोना स्थितीची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून संकलित केली जात असून, जिल्ह्यातील वाढत्या मृतांच्या संख्येकडेही फडणवीस राज्याचे लक्ष वेधणार आहेत.

डरना है, या लढना है?

आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहे, अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमवेतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे फेडरल स्ट्रक्चर लक्षात घेऊन राज्यघटना तयार केली आहे. त्यात सर्वांना अधिकार दिले आहेत. जर आपण त्याचा आदर करणार नाही, तर मग आपल्याकडे लोकशाही कुठे आहे? आपल्याला एकत्र यायला संकटाची गरज कशाला हवी? आपण एरवीसुद्धा भेटले पाहिजे. ज्यामुळे संकटच घाबरून म्हणेल की हे लोक एकत्र आहेत. एक बार तय करो डरना है, या लढना है, असे म्हणत ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर