या पुरस्कार वितरण कार्यक्रमास ‘सॅटर्डे क्लब’चे अध्यक्ष अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल प्रदीप मांजरेकर प्रमुख उपस्थित असणार आहेत. कोल्हापूरच्या मातीमध्ये अनेक उद्योजक घडले असून त्यांनी जागतिक पातळीवर करवीरनगरीचा ठसा उमटविला आहे. अशा उद्योजकांना सन्मानित करण्यासह त्यांच्या यशोगाथेतून नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपूर्वी सॅटर्डे क्लबने उद्योगरत्न पुरस्काराची सुरुवात केली. यावर्षीच्या पुरस्कारासाठी कोल्हापूर सीआयआय, चेंबर ऑफ कॉमर्स, गोशिमा, स्मॅक, क्रिडाई, आदी विविध संघटनांचे अध्यक्षांच्या समितीने ‘गुरुदत्त शुगर्स’चे माधवराव घाटगे यांची निवड केली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे क्लबच्या फेसबुक पेजवर प्रक्षेपण केले जाणार असल्याचे विशाल मंडलिक यांनी सांगितले. यावेळी योगेश देशपांडे, महेश पाटील, शैलेश देशपांडे, पिराजी पाटील, अश्विनी हंजे, मधुजा मिरजे, दीपा देशपांडे, राजेंद्र मिठारी, कुलदीप शिरगांवकर उपस्थित होते.
फोटो (१७०८२०२१-कोल-माधवराव घाटगे (पुरस्कार)