आमशी : (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला रामनाथ पाटील यांची तर उपसरपंचपदी नामदेव दिनकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. कोळी होते. आमशी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवशंभो आघाडीला ८ तर काळम्मा ग्रामविकास पॅनलला ३ जागा मिळाल्या होत्या. सरपंचपद सर्वसाधारण महिलेला असल्यामुळे या जागेसाठी उज्ज्वला रामनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, तर उपसरपंचपदासाठी नामदेव दिनकर पाटील यांचा अर्ज दाखल झाला. एकल अर्ज दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या. शिवशंभो ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व निवृत्ती पाटील, डी. एस. पाटील, आर. टी. पाटील, बाजीराव पाटील आणि ए. के. पाटील करत आहेत.
या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, भगवान गुरव, पल्लवी पाटील, आरती सावंत, शिवाजी पाटील, रेश्मा लोखंडे, बाजीराव कांबळे, तेजस्विनी पाटील, संगीता पाटील, ग्राम विकास अधिकारी संभाजी पां. पाटील, एस. एच. पाटील, तलाठी एस. व्ही. पाटील, पोलीस पाटील लता पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो -सरपंच - २६उज्वला पाटील
उपसरपंच -२६ नामदेव पाटील