याबरोबर गावात मूलभूत सुविधांची कामे झाली नाहीत. कचरा उठाव होत नाही. कमी दाबाने पिण्याचे पाणी येते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन नाही, असा आरोप करत सदस्यांनी ग्रामसेवकांविरोधात आवाज उठविला आहे. त्याअनुषंगानेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर विरोधी सदस्यांनी ‘खडा पहारा’ आंदोलन सुरू केले असून यामध्ये विरोधी गटनेते उत्तम आंबवडे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा पोवार, सोनाली मजगे, संगीता पाटील, अलका कांबळे, रिना गुमाने,उज्ज्वला केसरकर सहभागी झाल्या आहेत. आंदोलनस्थळी सरपंच सुवर्णा माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी भेट दिली.
कोट : विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून उजळाईवाडीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार कोरोना काळातही उत्तम प्रकारे सुरू आहे. यापूर्वी गावात विकासकामाचा अजेंडा तयार करून त्या पद्धतीने कामे केली आहेत. माझे कुणाशी वैर नाही. पण विरोधी सदस्य स्थानिकांचा रोष माझ्यावर काढत असतात.
बी. डी. कापसे ,
ग्रामसेवक, उजळाईवाडी
फोटो : १६ उजळाईवाडी
उजळाईवाडी ग्रामपंचायतीसमोर विरोधी गटाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाविराेधात 'खडा पहारा' आंदोलन सुरु केले. या प्रसंगी उत्तम आंबवडे व इतर ग्रा प सदस्य.