शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

उमा पानसरे यांचा जबाब तीन टप्प्यांत पूर्ण

By admin | Published: May 15, 2015 11:46 PM

मारेकरी मात्र बेपत्ताच : डावे पुरोगामी पक्ष व विविध संघटनांची बुधवारी निषेध फेरी

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब पूर्ण झाला. हा जबाब गोपनीय ठेवण्यात आला आहे. तपास अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पानसरे यांच्या जबाबाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिली. दरम्यान, आज, शनिवारी (दि. १६) पानसरे यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आहेत अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले नसल्याने कार्यकर्त्यांसह समाजातही अस्वस्थता आहे.कोल्हापुरात १६ फेबु्रवारी २०१५ ला सागरमाळ परिसरात गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये जखमी झालेले पानसरे यांचा मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) यांनी तपास केला आहे.. पानसरे यांच्या हत्येचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल करत होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी उमा पानसरे यांचा जबाब घेतला. तीन टप्प्यांत त्यांना आठवेल अशा पद्धतीने जबाब घेण्यात आला.उमाताई यांची प्रकृती आता सुधारली असली तरी त्यांच्या शरीराच्या एका बाजूला मार बसला आहे. त्यात फारशी सुधारणा नाही. त्यांची स्मृती सुधारली असली तरी हल्ला झाला त्यादिवशी नेमके काय घडले याबद्दल मात्र त्यांना आजही काहीच आठवत नाही. अगदीच त्रोटक माहिती त्या देत आहेत. दरम्यान, गोयल यांची वर्धा येथे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे परंतु अजूनही ही जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हल्ल्याच्या तपासातही ते सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे गोयल यांची बदली झाल्यामुळे तपास विस्कळीत होण्याची शक्यता नसल्याचे खात्याचे म्हणणे आहे. कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरात सकाळी-सकाळी कोणीतरी मारेकरी मोटारसायकलवरून येतात आणि पानसरे यांच्यासारख्या व्यक्तीला गोळ््या घालून पसार होतात व तब्बल तीन महिने झाले तरी पोलिसांना त्याबद्दल काहीच माहिती हाताला लागत नाही याबद्दल समाजमनात कमालीची चीड आहे. ती चीड व्यक्त करण्यासाठी येत्या बुधवारी (दि.२० मे) पानसरे कुटुंबीय व डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्यावतीने पहाटे साडेसहा वाजता निषेध फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी पानसरे यांच्या आयडियल सोसायटीतील बंगल्यापासून सुरू होईल.तिथून ती जिथे हल्ला झाला तिथे जाईल. पानसरे यांचा रोजचा मार्निंग वॉकचा मार्ग होता. त्या मार्गावरून ही फेरी विद्यापीठातील परीक्षा विभागापर्यंत जाईल तिथे पानसरे नेहमी कट्ट्यावर बसत असत. तिथून परत येऊन पानसरे यांच्या बंगल्यासमोर समारोप होईल.आज, शनिवारी पानसरे यांच्या हत्येला तीन महिने पूर्णतीन टप्प्यांत त्यांना आठवेल अशा पद्धतीने जबाब घेण्यात आलाउमाताई यांची स्मृती सुधारली तरी हल्ला झाला त्यादिवशीचे आठवत नाही.