कोल्हापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधार समितीच्या १४ वर्षाखालील गटासाठी सदस्य म्हणून माजी रणजीपटू उमेश गोटखिंडीकर यांची निवड झाली.
मूळचे कोल्हापूरचे असलेले गोटखिंडीकर सध्या मुंबईतील आयकर विभागात कार्यरत आहेत. त्यांनी क्रिकेटची सुरुवात पॅकर्स क्रिकेट क्लबमधून केली होती. महाराष्ट्र रणजी संघातून डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी आपल्या खेळाचा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत मुंबई क्रिकेट असोसिएशनने १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट सुधार समितीवर निवड केली. या समितीच्या अध्यक्षपदी जयप्रकाश जाधव, मंगेश दरेकर, रवी गडियार, सुधाकर हरमलकर यांचा या समितीत समावेश आहे. गोटखिंडीकर यांच्या रूपाने प्रथमच मुंबई क्रिकेट असोसिएशनने जणू कोल्हापूरच्या क्रिकेटचाच एक प्रकारे गौरव केल्याची भावना ज्येष्ठ क्रिकेटपटूंकडून व्यक्त होत आहे.
फोटो : ०८०७२०२१-कोल-उमेश गोटखिंडीकर