शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अन...धनगरवाड्यावरील सईबाईच्या नातवंडाची पायपीट थांबली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2020 1:58 PM

Student, Cycling, EdcationSector, kolhapur अणदूर (ता. गगनबावडा) इथल्या धनगरवाड्यावरील सईबाई बोडेकर या आजीची दोन नातवंडं...मराठी शाळेत शिकायला रोज सात मैलाची डोंगर दऱ्यातून सोडायला आजीची धडपड..पोरं शाळेला गेली की दिवसभर आजी वाटेला डोळ लावून बसतीया..पोरं घरी येवस्थित येतील न्हवं याची आजीला रूकरूक . नातवांनी शिकाव, शानं व्हाव ही आजीची जिद्द कायम.

ठळक मुद्देअन...धनगरवाड्यावरील सईबाईच्या नातवंडाची पायपीट थांबली..!शिक्षणासाठी आजीची सुरू असलेल्या तळमळीची दखल

हलकर्णी : अणदूर (ता. गगनबावडा) इथल्या धनगरवाड्यावरील सईबाई बोडेकर या आजीची दोन नातवंडं...मराठी शाळेत शिकायला रोज सात मैलाची डोंगर दऱ्यातून सोडायला आजीची धडपड..पोरं शाळेला गेली की दिवसभर आजी वाटेला डोळ लावून बसतीया..पोरं घरी येवस्थित येतील न्हवं याची आजीला रूकरूक . नातवांनी शिकाव, शानं व्हाव ही आजीची जिद्द कायम.धनगरवाड्यावरील लोकांची जगण्याची आणि मुलांच्या शिक्षणाची वाट स्वातंत्र्यानंतर बिकटच. नातवंडाच्या शिक्षणासाठी आजीची सुरू असलेल्या तळमळीची दखल घेतली ती सह्यगिरी संस्थेने आणि त्याला साथ दिली मयुर आणि सचिन या शिंदे बंधूनी..शिक्षणासाठी दररोज सात किलोमीटर पायपीट करणाऱ्या भागोजी आणि सखाराम या दोन विद्यार्थ्यांना नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील सचिन शिंदे व मयुर शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ह्यसह्यगिरी शैक्षणिक पालकत्वह्ण या उपक्रमांतर्गत सायकल भेट दिली. सचिन हा कानपूर आयआयटी (उत्तरप्रदेश) येथे प्राध्यापक आहे तर मयुर संकेश्वर (जि. बेळगाव) येथे ड्रायफ्रुटस व मसाले व्यावसायिक आहे.नातवंडाची शिक्षणासाठीची पायपीट थांबल्यामुळे आजीच्या चेहऱ्यांवील आनंद ओसंडून वाहत होता. आजीचे भावनिक कृतज्ञतेचे आणि आभाराचे चार शब्द ऐकून उपस्थितांची मने हेलावून गेली. यावेळी सरपंच दत्तात्रय गुरव, एम. जी. गुरव, सह्यगिरीचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, संभाजी कांबळे, नामदेव खाडे, विकास कांबळे, राजेश सातपुते यासह ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होते. संजय कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. विश्वास भोसले यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीCyclingसायकलिंग