शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

‘विनाअनुदानित गॅस’साठी मोजावे लागणार २७७ रुपये जादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 1:50 PM

तेल कंपन्यांकडून ग्राहकांना १२ अनुदानित सिलिंडरनंतर मिळणाऱ्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांना २७७ रुपये जादा देऊन सिलिंडरची खरेदी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याचे गणित कोलमडणार आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांचे महिन्याचे गणित कोलमडणार अंमलबजावणी सुरू : ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूर : तेल कंपन्यांकडून ग्राहकांना १२ अनुदानित सिलिंडरनंतर मिळणाऱ्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांना २७७ रुपये जादा देऊन सिलिंडरची खरेदी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याचे गणित कोलमडणार आहे. या नवीन दरवाढीची अंमलबजावणी गॅस वितरकांकडून सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांमधून या दरवाढीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जागतिक बाजारपेठेत इंधनदरात वाढ झाल्याचे कारण सांगून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १४४ रुपये ५० पैशांची वाढ केली आहे. यामुळे १३ पासूनची पुढील विनाअनुदानित सिलिंडर ग्राहकाला ८४५ रुपये ५० पैशांनी खरेदी करावी लागणार आहेत. अनुदानित सिलिंडरचा दर सध्या ५६८ रुपये इतका आहे.

सरासरी याच दराने ग्राहकाला १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत १२ सिलिंडर मिळतात. यावर कोणतीही दरवाढ झालेली नाही; परंतु ‘अनुदानित’चा कोटा संपून तेराव्या सिलिंडरपासून जे सिलिंडर खरेदी करावे लागते, त्याला ‘विनाअनुदानित’चा दर लागू होतो. त्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. जवळपास गेल्या सहा वर्षांतील ही सर्वांत मोठी वाढ असल्याचे दिसून येत आहे.

या नवीन दरानुसार गॅस वितरकांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. चारजणांचे कुटुंब असलेल्यांना एक सिलिंडर कसेबसे महिनाभर जाऊ शकते; परंतु एखाद्या कुटुंबात चारपेक्षा अधिकजण असल्यास हा कालावधी कमी होऊन तो २० ते २५ दिवसांवर येतो. त्यामुळे आर्थिक वर्षातील १२ अनुदानित सिलिंडरचा कोटा लवकरच संपतो. त्यानंतर विनाअनुदानितच्या माध्यमातून गॅस सिलिंडर खरेदी करावे लागते. त्याची झळ संबंधितांना बसते.विनाअनुदानितचा दर पूर्वी ६९९ इतका होता. १२ फेब्रुवारीला दरवाढीनंतर तो ८४५ रुपये झाला आहे. प्रत्यक्षात विनाअनुदानित सिलिंडरची १४४ रुपये ५० पैसे इतकी दरवाढ झाली असली तरी, सध्या अनुदानित सिलिंडरसाठी असलेल्या ५६८ रुपयांच्या तुलनेत विनाअनुदानितसाठीचा वाढलेला दर हा २७७ रुपये आहे. यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय ग्राहकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून या निर्णयाबाबत फेरविचार करण्यास भाग पाडावे, असा सूर उमटत आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. चारजणांच्या कुटुंबासाठी १२ अनुदानित सिलिंडर पुरेशी आहेत; परंतु ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या जादा आहे. त्यांना ही १२ सिलिंडर पुरणार नाहीत. त्यामुळे त्यांना विनाअनुदानित सिलिंडर खरेदी करावी लागणार असून, त्यांना याचा अधिक फटका बसणार आहेत.- उदय रसाळ, नागरिक

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांसह विशेषत: गृहिणींचे महिन्याचे गणित कोलमडणार आहे. महागाईने आधीच काटकसर करून संसाराचा गाडा चालविणाºया गृहिणींसाठी ही दरवाढ जिकिरीची आहे. सहा ते सात वेळा अशा पद्धतीने दरवाढ झाली आहे. हा दरवाढीचा निर्णय दुर्दैवी व चुकीचा आहे. सरकारने याचा फेरविचार करावा किंवा दरवाढ करायचीच असेल तर पर्याय म्हणून ग्राहकांना रेशनवर रॉकेल उपलब्ध करून द्यावे.- रूपाली पाटील, गृहिणी 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरkolhapurकोल्हापूरconsumerग्राहक