विनापरवाना मंडप : कोल्हापूर शहरातील आठ मंडळांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:56 PM2018-09-17T12:56:23+5:302018-09-17T13:00:04+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना उभा केलेल्या गणेशोत्सवातील मंडपावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ मंडळांच्या मंडपावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील ६ मंडळांवर व यादवनगर, महालक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एका मंडळावर करण्यात आली.

Unauthorized Pavilion: Action taken to eight Mandals in Kolhapur city | विनापरवाना मंडप : कोल्हापूर शहरातील आठ मंडळांवर कारवाई

विनापरवाना मंडप : कोल्हापूर शहरातील आठ मंडळांवर कारवाई

ठळक मुद्देविनापरवाना मंडप : कोल्हापूर शहरातील आठ मंडळांवर कारवाईऐन गणेशोत्सवात महापालिकेचा बडगा

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना उभा केलेल्या गणेशोत्सवातील मंडपावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ मंडळांच्या मंडपावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली.

ही कारवाई बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील ६ मंडळांवर व यादवनगर, महालक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एका मंडळावर करण्यात आली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता व पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

त्यामुळे शहरातील सार्वजनिक मंडळांनी उभारलेले विनापरवाना मंडप आपण स्वत:हून काढून घेऊन महापालिकेस सहकार्य करावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
 

 

Web Title: Unauthorized Pavilion: Action taken to eight Mandals in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.