शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम

By admin | Published: September 12, 2015 11:57 PM

सर्किट बेंच प्रश्न : कृती समितीच्या आजच्या बैठकीत होणार चर्चा

कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’प्रश्नी बेमुदत काम बंद आंदोलनावर वकील ठाम आहेत. खंडपीठ कृती समितीच्या आज, रविवारी होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. वकिलांसह पक्षकार बांधवांनी यापूर्वी मोठी आंदोलने केली आहेत. सलग ५५ दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते. या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी न्यायाधीश शहा यांनी कृती समितीला बैठकीचे निमंत्रण देत सर्किट बेंच स्थापनेची प्रक्रिया ही नियमबद्ध पद्धतीने करावी लागणार आहे. त्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करीत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने सर्किट बेंच सहा जिल्ह्याता कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत ठराव संमत केला असतानाही मंजुरीमध्ये दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी पक्षकारांनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेत न्या. शहा यांनी २१ आॅगस्ट रोजी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी पणजी (गोवा) येथे चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी निवृत्तीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. तसेच ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली होती. कृती समितीने ठरावांसह संस्थानकाळातील माहिती संग्रहित करून फाईल त्यांच्याकडे सादर केली होती; परंतु न्या. शहा यांनी सर्किट बेंचचा निर्णय न घेताच सेवानिवृत्ती घेतल्याने सहा जिल्ह्यांतील वकिलांनी हे आंदोलन सुरू केले आहे.