बोरवडे : उंदरवाडी (ता. कागल) येथील शीतल रंगराव पाटील या शेतकऱ्याच्या मुलीने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात सैन्यदलात भरती होण्याची किमया साधली आहे. उंदरवाडीला ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. पण अलिकडे गावातील तरुण-तरुणी लष्करात भरती होऊ लागल्याने आता उंदरवाडीची ‘जवानांचे गाव’ म्हणून नवी ओळख मिळत आहे. शालेय वयातच शीतलने पोलीस किंवा सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बाळगले. त्यादृष्टीने तिने नियमित व्यायामासह धावण्याचाही सराव केला. या शारीरिक तयारीसह अभ्यासाकडे लक्ष देत ती दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पुढे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतरही तिने व्यायाम व धावण्याचा सराव सुरुच ठेवला. गतवर्षी झालेल्या सैन्यदलातील भरतीसाठी तिने शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, शीतलची सैन्यदलात आसाम रायफलमध्ये निवड झाली आहे.
उंदरवाडीची शीतल पाटील करणार देशसेवा, सैन्यदलात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:23 AM