मोहन सातपुते ।उचगाव : शांत आणि औद्योगिक वसाहतीने चांगले बस्तान बसविलेल्या गोकुळ शिरगाव, तामगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी परिसराला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. छोट्या व्यावसायिकांना हप्त्यासाठी धमकावले जात आहे. पोलिसांनी शोध घेऊन अशा हप्तेबहाद्दरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.या परिसरात प्लॉट खरेदी-विक्री व्यवहारातील एजंटगिरी, मटक्यातील भागीदारी, एखाद्याचा प्लॉट किंवा जमीन द्यायची असल्यास त्याला गाठायचे त्याच्याकडून उचललेले पैसे घ्यायचे, त्याचे पैसे दुसऱ्याला द्यायचे, असे प्रकार घडत आहे. आॅनलाईन लॉटरी, जमिनीचे व्यवहार, तीन पत्ती जुगार, लूटमार, भुरट्या चोºया, वाढती गुन्हेगारी येथील कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वाढत असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याने वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. नोव्हेंबर १७ व फेब्रुवारी १८ मध्ये येथे दोन खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी फक्त दोन गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.गोकुळ शिरगाव येथील पान टपरीत जळालेल्या मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही. या परिसरात जमिनीला येणारे भाव, सावकारी, मटक्यात असलेली भागीदारी, छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत अडकलेल्या संशयित पण अट्टल पाकीटमार, दहशत निर्माण करून हप्तेगीरी करणाºया आणि आपल्या पैलवानकीच्या जोरावर दहशत निर्माण करून बगलबच्च्यांना सांभाळणाºया गावगुंडांची दहशत गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावून घेत आहे. मोकाटगुन्हेगार तर खंडणी, हप्ते, फुकटचे खाऊन दमदाटी देत फुकटच्या जेवणावर आजही ताव मारतआहेत.येथील वाढती गुन्हेगारी, वाटमारी, तर किरकोळ भांडणाचा राग मनात धरून वारंवार होणारे प्रसंग अनेकांना येत आहेत. कुळांना धमकावणे, रिकाम्या प्लॉटवर डोळा ठेऊन मोक्याच्या जागा हडप करणे, उद्योजक, व्यापारी, हॉटेलमालक, टपरीधारक, मॉल, गॅरेजधारकांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. मोरेवाडी, पाचगाव, उजळाईवाडी, तामगाव, गोकुळ शिरगाव, शाहू नाका या परिसरात तर भुरट्या, सराईत गुंडांनी तर कहरच केला आहे. स्वत:च्या चैनीसाठी गुंडांनी गोरगरिबांवर अत्याचार करणे थांबविलेले नाहीत.मटक्यात असलेली भागीदारी, जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मिळालेले पैसे, गोरगरिबांना धमकावून मिळविलेली संपत्ती आणि हप्तेगिरी यामुळे गोकुळ शिरगाव परिसराला गुंडाच्या दहशतीचे ग्रहण लागले आहे. या गुंडांविषयी नेहमी तक्रारीचा आलेख वाढत असताना पोलिसांनाही त्याच्या मुसक्या आवळणे जिकरीचे बनले आहे.बदनाम ग्रुपचे नामफलक त्वरित काढले पाहिजेतआज बºयाच ठिकाणी युवकांचे ग्रुप तयार होत आहेत. पण, काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे ग्रुप समाजकार्याच्या अडून दादागिरी करीत आहेत. अशा बदनाम ग्रुपचे नामफलक पोलिसांनी उखडून टाकले पाहिजेत.
गोकुळ शिरगाव दहशतीखाली,पान टपरीतील जळालेल्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:07 AM
उचगाव : शांत आणि औद्योगिक वसाहतीने चांगले बस्तान बसविलेल्या गोकुळ शिरगाव, तामगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी परिसराला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे.
ठळक मुद्देदोघांचे खून