शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:18 AM

गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकºयांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देइरिगेशन फेडरेशनचा शेतकरी मेळावा२१ जानेवारीला सरकारला धडकी भरविणारा चक्का जाम

कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकºयांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्का जाम आंदोलन होणार आहे. याच्या नियोजनासाठी गुरुवारी दुपारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संपतबापू पाटील, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, माजी सभापती बाबासो पाटील-भुयेकर, मारुतराव जाधव, मारुती पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकार आश्वासन देत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून आंदोलनाची तारीख पुढे सरकत गेली. आता थांबणे शक्य नाही. शेतकºयांचा संताप वाढला आहे. वीज कनेक्शन तुटू नये म्हणून संयमाने घेतले; पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पदरात पाडून घ्यायची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे शेतकºयांनी ताकदीने आंदोलनात उतरावे.

खासदार महाडिक म्हणाले, नुसती आश्वासने देणाºया सरकारला कोणाच्याच मागण्या मान्य करायच्या नाहीत, असे दिसत आहे. उद्योजकांना रस्त्यावर आणणाºया या सरकारने शेतकºयांनाही वाºयावर सोडले आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना उपाययोजना राहू देत, मृत्यूची आकडेवारीदेखील बाहेर जाऊ नये, याची दक्षता हे सरकार घेत आहे. या सरकारला घरी बसविण्याची हीच संधी आहे. आजचे मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. तलवार शेतकºयांच्या मानेवर पडणार आहे.

माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, सरकारकडे पैसे नाहीत आणि शेतकºयांकडेही नाहीत. दोघेही कंगाल आणि रिकामे आहेत. कंगालाकडून कसली वसुली करताय. सरकारने रिकाम्या माणसाला समजून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. भगवान काटे यांनी कळणाºया भाषेतच आम्ही आंदोलने करतो, राज्यकर्त्यांना गांधीगिरी कळत नाही. हातात बुडका घेऊनच वठणीवर आणतो, असे सांगून ऊस बिलाचा पत्ता नाही आणि मग विजेची बिले कशी काय मागता? असा सवाल केला. आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मनोगत व्यक्त करताना चक्का जाम ताकदीने करण्याचे आवाहन केले.साडेसतरा एचपीचा पंपच नाही, तर बिल कसे येतेसाडेसतरा एचपीचा पंपच बाजारात उपलब्ध नाही, तरीही महावितरणकडून साडेसतरा एचपी पंपाची बिले शेतकºयांना काढली असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणून देताना राज्यातील ४२ लाखांपैकी केवळ ३५ हजार पंपांचीच बिले व मीटर रीडिंग जुळत आहे. उर्वरित बिले अंदाजे काढली जात आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात आणि विशेष म्हणजे पंप आणि ट्रान्स्फॉर्मर काढून ठेवलेला असतानाही १२५ युनिटचे बिल शेतकºयाला येते. ३0 टक्के गळती असताना ती १५ टक्के दाखविली जाते. एक टक्का म्हणजे ७00 कोटी, असा हिशेब धरला, तर १0 हजार ५00 कोटींची बोगस बिले काढली जातात. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकºयांची थकबाकी वाढविली जाते, हे सर्व ऊर्जा खात्यातील मंत्री, अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.महाडिक नको, राष्ट्रवादीचे म्हणाधनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना चक्का जाम आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आणावे, असे इरिगेशन फेडरेशनचे कार्यकर्ते रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. यावर खासदार महाडिक यांनी पटकन महाडिक नको राष्ट्रवादीची युवा शक्ती म्हणा, असे हळूच सांगितले. खासदारांना राष्ट्रवादीतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर किती धसका घेतलाय, याचीच प्रचिती आली.पवारांचेच सरकार येणारआता पवारांचेच सरकार येणार आहे, त्यांनीमाफी द्यायचे मान्य केले आहे. मग कशाला आमच्या डोक्यावर बसलाय? असे स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत म्हटल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्का जाम आंदोलन होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी दुपारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. यावेळी प्रा. एन. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. डावीकडून मारुतराव जाधव, विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, खासदार धनंजय महाडिक, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmer strikeशेतकरी संप