शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

‘पेपरफुटी’ निदर्शनास आणून देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:24 AM

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापूर्वी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेवेळी पेपरफुटीचे प्रकरण तळसंदे परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने निदर्शनास आणून दिले. त्यावर ...

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापूर्वी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेवेळी पेपरफुटीचे प्रकरण तळसंदे परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने निदर्शनास आणून दिले. त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी संबंधित महाविद्यालयाला समज देण्यासह तेथील साधारणत: २५ विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्याचा प्रकार शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केला. परीक्षा प्रमाद समितीने कारवाई करण्याबाबतची शिफारस करूनही विद्यापीठाच्या प्रशासनाकडून त्याबाबत काहीच कार्यवाही केलेली नाही.

एप्रिल-मे २०१९ मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या. त्यात दि. ९ मे रोजी मॅकेनिकल अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील ‘फ्लुड मेकॅनिकल’ या विषयाचा पेपर हा परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांच्या व्हॉटस‌्ॲपवर आला. विद्यार्थ्यांनी याची माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रशासनाने त्याची माहिती तातडीने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला दिली. या प्रकरणाची चौकशी करून पेपरफुटीला कारणीभूत असलेल्या घटकांवर परीक्षा मंडळाकडून तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, उलट परीक्षा मंडळाने पेपरफुटी निदर्शनास आणून देणाऱ्या महाविद्यालयाला त्यांनी परीक्षेचे काम दक्षतेने करावे अशी समज दिली. त्या महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांचे मोबाईल चौकशीच्या कारणावरून ताब्यात घेतले. पेपरदेखील बदलला नाही. विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीने पेठनाका येथील एका महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एफआयआर दाखल करावा, अशी शिफारस केली होती. त्याला दीड वर्ष झाले, तरी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या प्रकरणी विद्यापीठ अधिकार मंडळातील काही सदस्यांनी आवाज उठविला. त्यालाही प्रशासनाने दाद दिलेली नाही.

चौकट

प्रशासनाला गांभीर्य नाही

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अधिसभेच्या बैठकीत सदस्य भैया माने यांनी या पेपरफुटीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही सुरू असल्याचे जुजबी उत्तर दिले. या प्रकरणातील कार्यवाहीबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया

पेपरफुटीचे प्रकरण निदर्शनास आणून देणाऱ्या महाविद्यालयाला समज देणे आणि तेथील २५ विद्यार्थ्यांचे मोबाईल दीड वर्षापासून विद्यापीठ प्रशासनाने आपल्या ताब्यात ठेवणे योग्य नाही. वास्तविकपणे विद्यापीठाने याबाबत सायबर क्राइमकडे तक्रार करणे आवश्यक होते. प्रशासन कारवाई का करत नाही, हेच समजत नाही. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही लवकर करावी.

-अमरसिंह रजपूत, सदस्य, अधिसभा