कोल्हापूर : भ्रष्टाचार, ढपल्यामुळे कोल्हापूर महापालिकेची प्रतिमा राज्यात खराब झालेली आहे. ही प्रतिमा सुधारत केंद्र व राज्य सरकारकडून निधी खेचून आणून कोल्हापूर विकासाच्या पातळीवर राज्यात ‘नंबर वन’ करण्याचा संकल्प करूनच ‘भाजप-ताराराणी’ आघाडी रिंगणात उतरल्याची माहिती ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. केवळ केंद्र व राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आराखडा तयार केला असून, कोणत्याही परिस्थितीत महापौरपदाची खांडोळी केली जाणार नसल्याची ग्वाहीही महाडिक यांनी यावेळी दिली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वरूप महाडिक व सुनील मोदी यांनी सोमवारी सकाळी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास भेट दिली. त्यामध्ये त्यांनी निवडणुकीतील आघाडीचा अजेंडा व विकासाचे नियोजन याबाबत सविस्तर भूमिका विशद केली. निवडणुकीतील आमचा जाहीरनामा हा वस्तुस्थितीला धरून असणार आहे. याबाबत महिन्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मुंबईत बोलावून घेऊन जाहीरनाम्याबाबत काही सूचना केल्या आहेत. या सूचनांचा बारकाईने आभ्यास करून तयार केलेला विकासाचा जाहीरनामा घेऊन आम्ही कोल्हापूरच्या जनतेसमोर जाणार असल्याचे स्वरूप महाडिक यांनी सांगितले. केंद्रात भाजपची सत्ता आहे. रेल्वे, अमृत, स्मार्ट सिटी, सांडपाणी व्यवस्थापन, तीर्थक्षेत्र, हेरिटेज, आदींसाठी विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणणार आहे. तो कसा व कधी आणायचा याचा आराखडा आघाडीने तयार केला आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत, त्याचा फायदा कोल्हापूर शहराला कसा होईल, यासाठी आघाडी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर (पान् राज्य सरकारच्या माध्यमातून ड्रेनेज, रस्ते, रंकाळा संवर्धन, शहरातील वाहतुकीची कोंडी आदी प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता, महापालिकेच्या उत्पन्नातून काय विकास करता येतो, याचा स्वतंत्र अजेंडा तयार केला आहे. १९७६ पासून शहरातील रस्त्यांचे नियोजन झालेले नाही. त्यासाठी महापालिकेकडून मिळालेला फंड व त्याचा वापर यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्वरूप महाडिक यांनी सांगितले. ताराराणी आघाडीच्या काळात अनेक चांगली कामे केली आहेत. स्वर्गीय दिलीप मगदूम यांनी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम राबविला. भीमराव पोवार व इतर महापौरांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. हे जरी खरे असले तरी पक्षीय पातळीवर ताकद नसल्याने शासकीय निधी खेचून आणण्यावर मर्यादा येत होत्या. यासाठी यावेळीस ताराराणी आघाडीने भाजपशी हातमिळवणी केल्याचे महाडिक यांनी सांगितले. शिवसेनच्या टीकेबाबत स्वरूप महाडिक म्हणाले, आम्ही सकारात्मक राजकारण करणारी मंडळी असल्याने शिवसेनेवर टीका केली नाही आणि करणारही नाही. आमचे खरे प्रतिस्पर्धी हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने तेच आमचे मुख्य टार्गेट असेल. यावेळी सुनील मोदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)यासाठीच भाजपबरोबर आघाडीविधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी भाजपची उमेदवारी घ्यावी, यासाठी अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. अमल यांनी उमेदवारी घेण्याची तयारी दर्शविली, पण ‘सोयीचे राजकारण’ न करता एकाच पक्षात ठाम राहण्याची भूमिका त्यांनी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासमोर मांडली. आमदार महाडिक यांनी त्याला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर अमल यांनी उमेदवारी स्वीकारली. महाडिक गटाने महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढावी, अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली होती. तसे केले तर चुकीचा संदेश समाजात जाईल म्हणून आमदार अमल महाडिक यांनी त्याला विरोध करत भाजपशी आघाडी करावी, असा आग्रह धरला. त्यामुळेच भाजपबरोबर आघाडी झाल्याचे स्वरूप महाडिक यांनी सांगितले. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ हाच निकषभाजप-ताराराणी आघाडीने उमेदवारांची निवड करताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ हाच निकष लावला आहे. इतरांसारखे उसने उमेदवार घेण्याची वेळ आमच्यावर आली नसल्याचा टोलाही महाडिक यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला. त्रिशंकू अवस्था झाल्यास शिवसेनेला प्राधान्यआमच्या ५० ते ५५ जागा निवडून येणार हे निश्चित आहे तरीही त्रिशंकू अवस्था झाली आणि सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घ्यावी लागली, तर शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्र असल्याने मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेला प्राधान्य देतील, असेही महाडिक यांनी सांगितले. विधानपरिषदेसाठी महादेवराव महाडिकच ‘ताराराणी’चे नेतृत्व जरी करीत असलो तरी आगामी विधानपरिषदेसाठी आपण इच्छुक नाही. आमदार महादेवराव महाडिकच पुन्हा रिंगणात राहतील. मात्र, कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यायची, याबाबत आताच बोलणे उचित नसल्याचे सूचक वक्तव्यही स्वरूप महाडिक यांनी केले. मालोजीराजेंचे समर्थक आमच्याबरोबर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीच्या वतीने आम्ही माजी आमदार मालोजीराजे छत्रपतींना भेटलो होतो. यावेळी त्यांनी, आपण काँग्रेसमध्ये आहे; पण सक्रिय नाही. महापालिका निवडणुकीत कोणाच्या बाजूने भाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांचे बहुतांश समर्थक आमच्याबरोबर असल्याचे स्वरूप महाडिक यांनी सांगितले तर काहीजण कॉँग्रेसबरोबरही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचा पक्षआमची भूमिकासत्ता आल्यास हे करणारस्वच्छ व विकासाभिमुख कारभारकेंद्र व राज्य सरकारचा जास्तीत जास्त निधी खेचून कोल्हापूर विकासाचे मॉडेल करणारलिकिंग सिग्नल योजनाभटक्या जनावरांचा बंदोबस्त भिकारीमुक्त कोल्हापूर महापालिका जागा विकसित करून उत्पन्न वाढविणारप्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष आराखडा असा करणार प्रचारपथनाट्य ४चित्ररथ वव्हिडीओ गाड्या ४कॉर्नर सभा थेट संपर्क यांच्या होणार सभामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउच्च व तंत्रशिक्षणमंत्रीविनोद तावडेअर्थमंत्री सुधीर मनगुंटीवारग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
ढपलामुक्त महापालिका हाच अजेंडा!
By admin | Published: October 13, 2015 12:33 AM