प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी आज सकाळी ११.३० वाजता नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दत्त दर्शनासाठी भेट दिली. हा त्यांचा खासगी दौरा होता. यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी व सचिव गजानन गेंडे विश्वस्त संतोष खोंबारे, संजय पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. सोनल शहा यांनी श्रीकृष्णा व पंचगंगा नदीचे दर्शन घेऊन श्री दत्त चरणांचे दर्शन घेतले व प्रार्थना केली. यावेळी दत्त देवस्थानमार्फत त्यांचे स्वागत करून प्रसाद व प्रतिमा देण्यात आली. यावेळी शिरोळचे तहसीलदार उपस्थित होते. आज गुरुवार असलेने येथील मंदिरात गर्दी होती अनेक भाविकांनी त्यांच्यासोबत सेल्फी, फोटो काढले.
Kolhapur: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नीने नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:43 IST