महामुनी हे बुलडाणा येथे कार्यरत असताना २६ एप्रिल २०२१ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. दोन युवकांनी चिखली येथील फूटपाथवर झोपलेल्या अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार केला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळून गुन्हयाचा तपास करणे आव्हानात्मक होते. या गुन्हयातील तांत्रिक, भौतिक पुरावे, वैद्यकीय पुरावे, साक्षीदार, कागदोपत्री पुरावे, दृक स्वरूपातील पुरावे आदींच्या अनुषंगाने या गुन्हयाचा सखोल तपास केला, तसेच त्या दोघा आरोपींवर कारवाई करून त्यांच्यावरील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोषी ठरवून १३ ऑगस्ट २०२० रोजी फाशीची शिक्षा सुनावली. या गुन्हयाचा उत्कृष्ट आणि गुणात्मक तपास केल्याने महामुनी यांना हे पदक जाहीर झाले आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बाबूराव महामुनी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:29 AM