कोल्हापूर: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज, सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बसर्गे गावी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. हालगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरत ते तल्लीन झाले होते.सिंधिया यांचे दुपारी दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यासाठी हुबळी येथे आगमन झाले. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासमवेत ते बेळगावमार्गे चंदगड तालुक्यात आले. या ठिकाणी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या बसर्गे येथील जलजीवन पाणी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. त्याआधी त्यांच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत लेझीम खेळत शाळकरी मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी खासदार महाडिक यांनी सिंधिया यांना लेझीम खेळण्याचा आग्रह धरला आणि सिंधिया यांनीही हालगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका
By समीर देशपांडे | Published: February 27, 2023 7:15 PM