कोल्हापूर : अनेकांच्या घरांमध्ये सर्वांत माणसाळलेला प्राणी म्हणजे मांजर होय. या देशी आणि विदेशी विविध प्रांतात असलेल्या या पाळीव मांजरांची विविध रूपे कोल्हापूरकरांना रविवारी पाहायला मिळाली, निमित्त होते. फेलाईन क्लब आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित ‘कॅट शो’चे.लोणार वसाहत येथील महाराजा बॅकवेट फेलाईन क्लब आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने रविवारी हा अनोखा ‘कॅट शो’ रंगला. कोल्हापुरात प्रथमच झालेला शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, कोलकाता येथून देशी व विदेशी प्रजातींची २५० हून अधिक मांजरांचा या शोमध्ये समावेश होता. यावेळी मांजराची निगा, त्यांचे आरोग्य, लसीकरण, आहाराची या ‘कॅट शो’च्या निमित्ताने सर्वांना माहिती देण्यात आली. लहान मुलांसह आबालवृद्धांनी या अनोख्या शोचा आनंद घेतला.यामध्ये विशेषकरून पर्शियन, क्लासिक लॉग हेअर, बेगॉल कॅट (बिबट्यासारखे), मोठा साईज मेन कून इंडिमाऊ असे अशा विविध प्रजातीच्या मांजरांचा सहभाग होता. देशी व विदेशी अशा दोन विभागांत व परदेशी मांजरांच्या विविध जातनिहाय निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली.लाखोंच्या घरात किमतीफेलाईन क्लब आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित ‘कॅट शो’मध्ये दहा हजार रुपयांपासून चार लाख रुपये किंमत असलेली मांजरे सहभागी झाल्याचे संयोजकांनी सांगितली.फोटोसाठी गर्दी...शोमध्ये पिंजऱ्यामधील देशी व विदेशी जातीचे विविध मांजरे होती. प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरे एका ठिकाणी पाहण्यास मिळत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अनोख्या मांजराचे फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.