शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मनीमाऊंचे नखरे बघण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी, बैंगाल कॅट लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 3:08 PM

कोल्हापूर : देशविदेशांतील मऊ मऊ मांजरांच्या अदा, नखरे आणि त्यांच्यात रंगलेल्या स्पर्धा, प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी दहा हजारांहून अधिक आबालवृद्धांनी ...

कोल्हापूर : देशविदेशांतील मऊ मऊ मांजरांच्या अदा, नखरे आणि त्यांच्यात रंगलेल्या स्पर्धा, प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी दहा हजारांहून अधिक आबालवृद्धांनी गर्दी केली. फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने रविवारी महासैनिक दरबार हाॅल येथे अनोख्या कॅट शो आयोजित केला होता. त्यात सॅबेरियन, पार्शियन, इंडी माऊ, बैंगाल टायगर अशा तीनशेहून अधिक मांजरांच्या पिंजऱ्यात राहूनही अदा पाहण्यासारख्या होत्या.गेल्या पाच वर्षे हा खास मांजरांसाठी निर्माण झालेल्या क्लबच्यावतीने खास देशविदेशांतील मांजरांचे अर्थात कॅट शो चे आयोजन केले जात आहे. यात कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता या क्लबने देशी इंडीमाऊसह परदेशातील विविध जातीची आणि वीस ते पाच लाखांपर्यंतच्या मांजरांचे प्रदर्शन कोल्हापूर नगरीत भरविले आहे. पाच वर्षात तीन वेळा झालेल्या प्रदर्शनाला अगदी दोन वर्षाच्या बालकांपासून ते नव्वदीतील आजोबा-आजींच्यापर्यंतची मंडळी हा अनोखा मांजरांचा शो पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. सहभागी होणारी मंडळी तर कोल्हापूरसह बंगळूरू, बेळगाव, सोलापूर, मुंबई, पूणे, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून सहभागी झाली होती.यावेळी मांजरांची निगा, त्यांचे आरोग्य, लसीकरण, आहाराची या कॅट शोमध्ये माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याकरीता प्राण्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी चाळीस हजार मोफत पासेस क्लबने वाटले होते. त्यामुळे दिवसभरात या शोच्या ठिकाणी लहानग्यांसह पालक मंडळींच्या रांगाच रांगा असे चित्र होते.लहानग्यांच्या उत्साह तर ओसांडून वाहणारा होता. स्वयंसेवकांची सर्वांना आवर घालताना तर चांगलीच दमछाक झाली. विशेषत : बेंगॉल कॅट अर्थात चित्यासारखे दिसणारे मांजर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. क्लासिक लाँग हेअर, बँगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झाटिक शॉर्ट कॅट, सॅबेरियन कॅट, सियामिस, ओरिवो, भारतीय जातीचे इंडी माऊ अशा विविध प्रजातींच्या मांजराचा यात समावेश होता.भारतीय आणि विदेशी असे दोन भागात मांजराच्या प्रजातीनिहाय निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली. या मांजरांचे मूल्यमापन करण्यासाठी मलेशियाहून सेन अब्दूल, ऑस्ट्रेलियाहून मायकल वूडस, भारतीय तज्ज्ञ साकीब पठाण यांनी परीक्षण केले. शो यशस्वी होण्यासाठी मोहम्मद राजगोळे, दिगंबर खोत, अखिल तांबोळी, मुकुंद भेंडिगिरी, दस्तगीर शिकलगार, शुभम कोतमिरे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर