सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजच्या तरुणांच्या मध्ये ऐक्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केले.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी यांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा कांबळे होत्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून ‘गोकुळ’चे अध्यक्ष पाटील म्हणाले, समाज परिवर्तनासाठी ग्रामीण तरुणांनी पुढे आले पाहिजे. शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
यावेळी ग्रामपंचायतीतर्फे भेटवस्तूंचे वितरण विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी सरपंच एस. के. पाटील, युवा नेते माधव पाटील. उपसरपंच सचिन पाटील, संजय पाटील, तुळशी सहकार समूहाचे नेते सरदार पाटील, एकनाथ भोपळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ग्रामसेवक बी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शेवटी मच्छिंद्र कांबळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ - शिरोली दुमाला (ता . करवीर) येथे ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते संगणक व भेटवस्तू वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सचिन पाटील, डॉ. मधुरा मोरे, सरदार पाटील, अनिल सोलापुरे, माधव पाटील, राहुल पाटील, एकनाथ भोपळे, एस. के. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.