शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

विद्यापीठांनी रोजगार देणारे शिक्षण द्यावे :पी. पी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:12 PM

कोल्हापूर : केवळ पदवीधर निर्माण करण्यापेक्षा निश्चित रोजगाराची हमी देणारे शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी. संशोधन हा विद्यापीठाचा मूलभूत ...

कोल्हापूर : केवळ पदवीधर निर्माण करण्यापेक्षा निश्चित रोजगाराची हमी देणारे शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी. संशोधन हा विद्यापीठाचा मूलभूत पाया आहे. कल्पकता, कठोर परिश्रम यांच्या बळावर नवसंशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी रविवारी केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये गतीने बदल होत आहेत. अनेक प्रकारची प्रतिकूल आव्हाने प्रादेशिक विद्यापीठांसमोर आहेत. जागतिक स्पर्धेत आपले विद्यार्थी कसे टिकतील, याचा विचार विद्यापीठांनी करणे आवश्यक आहे. विद्यापीठाने आता समाजाकडे जावे. त्या दृष्टीने पारंपरिक शिक्षणपद्धती, धोरणात्मक बदल करावेत. नव्या बदलांना सामोरे जाण्यास सज्ज व्हावे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचा विशेष संग्रहशिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या विविध स्वरूपांतील उपलब्ध आॅनलाईन स्रोतांचे एकत्रित संकलन केले आहे. त्याचे विशेष वेब-पेज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तयार केले आहे. त्यामध्ये १४२ ई-बुक्स, आॅडिओ बुक्स, विकिपीडियावरील लिंक्स, चित्रपट आणि पीएच. डी. शोधप्रबंध आहेत. संबंधित वेब-पेजचे या कार्यक्रमात उद्घाटन झाले.