शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

राष्ट्रभाषेच्या परीक्षांना विद्यापीठस्तराचा दर्जा

By admin | Published: September 14, 2014 12:34 AM

केंद्र शासनाचा निर्णय : पदोन्नती, नोकरी करत शिक्षण घेणाऱ्यांना सुवर्णसंधी

प्रकाश मुंज / कोल्हापूरहिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षा आता बोर्ड व विद्यापीठ स्तरावरील पदव्यांना समांतर मानल्या जाणार आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयाचा लाभ नोकरी करत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना तसेच नोकरीत पदोन्नतीसाठी होणार आहे .केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला त्यांच्या सध्याच्या अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार दिल्लीतील हिंदी संस्थानच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्यावतीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये काहीअंशी बदल करून अभ्यासक्रमातील प्रकरणे वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचबरोबर सर्व परीक्षांच्या पेपरची संख्यादेखील वाढविली जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून, येत्या १५ जानेवरीपासून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षा या राज्यातील एसएससी व एचएससीचे बोर्ड आणि सर्व विद्यापीठस्तरावरील पदव्यांना समांतर असणार आहेत. म्हणजे राष्ट्रभाषा सभेची प्रबोध परीक्षा उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कोणत्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गामध्ये व राष्ट्रभाषा पंडित परीक्षा उत्तीर्ण होणारा विद्यार्थी एम.ए.साठी विद्यापीठस्तरावर प्रवेश घेऊ शकतो. त्याचबरोबर कोणतीही स्पर्धा परीक्षाही देऊ शकतो. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांत काम करणारे कर्मचाऱ्यांनाही या परीक्षा देता येतील. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षांना आता महत्त्व प्राप्त होणार आहे.