कोल्हापूर : प्राध्यापकांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमचे विद्यापीठाने आदेश द्यावेत. मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना (सीएचबी) विद्यापीठाने मान्यता दिली होती, त्यांना यंदाही नेमणूक देण्यात यावी, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने केल्या.
या मागण्यांबाबत आघाडीच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा केली. तृतीय वर्षाचे सर्व वर्गांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत. द्वितीय व तृतीय वर्षाचे प्रवेश देण्यासाठी परवानगी द्यावी, त्यासाठी वाढीव तुकडीची मंजुरी द्यावी. महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्यांना तत्काळ मान्यता द्यावी, आदी मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. करमळकर यांनी दिले. या शिष्टमंडळात प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, डी. आर. मोरे, डॉ. गवळी, प्रवीण चौगुले, डी. जी. कणसे, व्ही. एम. पाटील यांचा समावेश होता.