समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर विनाविजेच्या आयलँडने गंगावेश चौक उजळणार असून, रेडियम आणि वाहनांचा प्रकाशाच्या माध्यमातून हा चौक रंगीबेरंगी दिसणार आहे. कोल्हापूरसह बाहेरच्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेणारा हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टच्या कोल्हापूर शाखेतर्फे उभारण्यात येणार आहे. कोल्हापुरातील वेगवेगळ्या चौकांचे सुशोभीकरण करण्याच्या मोहिमेला गेल्या वर्षापासून गती आली आहे. कोल्हापूर रस्ते सुशोभीकरण प्रकल्पाचे सूजय पित्रे यांची संकल्पना आणि त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे भक्कम पाठबळ यामुळे त्याचे दृश्य परिणाम कोल्हापुरात दिसत आहेत. अशातच ‘आयआयए’च्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात काही तरी करावे, असा कोल्हापूर सेंटरचे चेअरमन आर्किटेक्ट सतीशराज जगदाळे यांचा मानस होता. त्यानुसार पित्रे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गंगावेशच्या चौकामधील आयलंड उभारण्याची तयारी ‘आयआयए’च्या कोल्हापूर सेंटरने दर्शविली. मात्र, या ठिकाणी अशाप्रकाराची काही तरी हटके संकल्पना राबविण्याचे जगदाळे आणि त्यांचे सहकारी अभिनंदन मगदूम, संतोष सामाणी यांनी ठरविले.आयलँंडची वैशिष्ट्येखाली २ फुटांची दोन सर्कल येतीलत्यावर १६ फूट उंचीच्या पाईप्स उभारल्या जातील मुख्य पाईपची उंची २० फूटत्याच्या आजूबाजूला काही पाईप्स असतील सर्कलमध्ये आणखी पाच कमी उंचीच्या पाईप्स राहतीलमध्ये हिरवळ लावण्यात येईल ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्स’ या देशपातळीवरील संस्थेचे यंदा १०० वे वर्ष सुरू आहे. या संस्थेच्या कोल्हापूर सेंटरचा चेअरमन म्हणून काम करताना कोल्हापूर शहराच्या सुशोभीकरणामध्ये आमचाही सहभाग असावा, ही इच्छा होती. त्यानुसार मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही वेगळी आयलँंड संकल्पना मांडली आहे. . - सतीशराज जगदाळे (चेअरमन, आयआयए, कोल्हापूर)मनमोहक रंगसंगतीया पाईप्सवर ग्लास पेंटिंग करताना आणि रेडियमचा वापर करतानाही त्याची रंगसंगती वैशिष्ट्यपूर्ण ठरेल याची काळजी घेण्यात आली आहे. आकाशाचा निळा रंग, कोल्हापूरच्या परिसराचे प्रतिनिधित्व करणारा हिरवा, अंबाबाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हळदी-कुंकवातील हळदीचा पिवळा रंग, जोतिबाच्या गुलालाचा गुलाबी रंग आणि शांततेचा पांढरा रंग अशी प्रतीकात्मक रंगसंगती येथे दिसणार आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्स’ या देशपातळीवरील संस्थेचे यंदा १०० वे वर्ष सुरू आहे. या संस्थेच्या कोल्हापूर सेंटरचा चेअरमन म्हणून काम करताना कोल्हापूर शहराच्या सुशोभीकरणामध्ये आमचाही सहभाग असावा, ही इच्छा होती. त्यानुसार मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही वेगळी आयलँंड संकल्पना मांडली आहे. . - सतीशराज जगदाळे (चेअरमन, आयआयए, कोल्हापूर)
विनाविजेच्या आयलँडने गंगावेश चौक उजळणार
By admin | Published: April 20, 2017 1:21 AM