शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; ऊसतोडणी ठप्प, गुऱ्हाळघरे थंडावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:27 PM

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण ...

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण व अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अवकाळी पावसाने ऊसतोडणी यंत्रणेसह गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत. आज, बुधवारपासून आकाश कोरडे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले आहे. रविवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी दिवसभर पुन्हा आकाश गच्च राहिले. सायंकाळनंतर पावसाची भुरभुर सुरू झाली. रात्री अनेक ठिकाणी जोरदार कोसळला. मंगळवारी पहाटे करवीरसह पन्हाळा, राधानगरी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.सध्या ग्रामीण भागात ऊसतोडणी, गुऱ्हाळघरांचा हंगाम सुरू आहे. पावसाने ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय आला आहे. जिथे पाऊस जोरदार झाला आहे, तिथे तोडणी थांबवावी लागली आहे. शिवारातून वाहनात ऊस भरताना चिखलामुळे पाय निसटतात, त्याचाही परिणाम तोडणी यंत्रणेवर झाला आहे. वीट व्यावसायकांची तारांबळ उडाली असून, विटा झाकून ठेवण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू होती. आजपासून आकाश स्वच्छ राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.वेलवर्गीय पिकांना फटकाढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे वेलवर्गीय पिकांना मोठा फटका बसणार आहे. किडीचा प्रादुर्भाव वाढत असून विशेष काकडी, दोडका, कलिंगडे ही पिके अडचणीत येणार आहेत.

वैरण, शेणी झाकण्यासाठी धावाधाववाळलेली वैरण, शेणी झाकण्यासाठी मंगळवारी पहाटे सगळीकडे धावाधाव सुरू असल्याचे दिसले. गुऱ्हाळघरांवर जळण ताडपत्रीने झाकण्यात आल्याचे दिसले.

असे राहील आगामी चार दिवसांत तापमान, डिग्रीमध्येबुधवार - १९ ते ३१गुरुवार - १९ ते ३२शुक्रवार - १८ ते ३३शनिवार - १९ ते ३१

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसweatherहवामान