कोल्हापूर : ॲस्टर डी.एम. हेल्थकेअर या जागतिक स्तरावर अग्रगण्य असणाऱ्या ग्रुपने डाॅ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने कोल्हापुरातील ॲस्टर आधार हाॅस्पिटलमध्ये ‘स्पुतनिक व्ही’ लस अनावरण करून मर्यादित स्वरूपात उपलब्ध केली होती.
भारतातील लसीकरणाच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये कोची (केरळ) आणि कोल्हापूर शहरामध्ये ॲस्टर मेडसिटी, कोची व ॲस्टर आधार, कोल्हापूर या हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक व्ही लसीच्या मर्यादित डोसचे अनावरण करण्यात आले. या लसीचे लसीकरण डाॅ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे कोल्हापूर भागातील कर्मचारी करीत होते. हे लसीकरण राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून करण्यात आले. यावेळी नोंदणी, प्रतीक्षा कक्ष, लसीकरण क्षेत्र, लस घेतल्यानंतर ३० मिनिटांसाठी लागणारा निरीक्षण कक्ष यांचे नियोजन योग्य पद्धतीने केले गेले होते.
फोटो : २३०६२०२१-कोल-ॲस्टर
ओळी : कोल्हापुरातील ॲस्टर आधार हाॅस्पिटलमध्ये स्पुतनिक व्ही लसीचे डाॅ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या कोल्हापूर भागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.