शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA  Live Match : भारतीय संघाने टॉस जिंकून अर्धी लढाई जिंकली, रोहित शर्माचा सहकाऱ्यांना सल्ला
2
30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट
3
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
4
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे चेहरे केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
5
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
6
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
7
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
8
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
9
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
10
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
11
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
12
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
13
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
14
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
15
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
16
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
17
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
18
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
19
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!
20
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...

आगामी विधानसभा लढवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककसबा सांगाव : येत्या विधानसभेची निवडणूक लढवावीच असे आव्हान देतानाच मैदानातून पळ काढू नये, नाही तर लोक भ्याला म्हणतील, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता पुणे म्हाडाचे अध्यक्ष, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना लगावला. सुळकूड येथे दूधगंगा नदीवरील बांधण्यात येणाºया नूतन पुलाच्या भूमिपूजन समारंभात ते ...

लोकमत न्यूज नेटवर्ककसबा सांगाव : येत्या विधानसभेची निवडणूक लढवावीच असे आव्हान देतानाच मैदानातून पळ काढू नये, नाही तर लोक भ्याला म्हणतील, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता पुणे म्हाडाचे अध्यक्ष, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना लगावला. सुळकूड येथे दूधगंगा नदीवरील बांधण्यात येणाºया नूतन पुलाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, ‘स्वाभिमानी’चे भगवान काटे प्रमुख उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले की, त्यांचे एक वयस्क कार्यकर्ते माझ्याकडे आले व म्हणाले की, अजून ते लहान आहेत, त्यांना माफ करा. ते असे का करीत आहेत असे विचारले असता कागल तालुक्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हसन मुश्रीफ यांना अंगावर घ्यावे लागेल. संजय घाटगे यांचे नाव रेसमधून कमी होण्यासाठी सारखे चर्चेत राहावे लागेल असे त्यांना कोणीतरी सांगितले आहे, असे हे कार्यकर्ते म्हणाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.ते म्हणाले की, सन २०१२ मध्ये तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक व मी या पुलासाठी पाठपुरावा करून ५ कोटी निधी मंजूर केला होता. पाया न लागल्याने दोन ते अडीच कोटी वाढीव निधीची गरज होती. त्यासाठी खासदार महाडिक व राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे उद्घाटनाचे अधिकार आमदार व खासदार यांनाच असतात. त्यामुळे आमच्या आडवे येण्याचा प्रयत्न करु नका.यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, सत्तेत नसतानाही मुश्रीफांची भागाच्या विकासासाठी निधी आणण्याची धडपड असते. मंत्री असताना मोठी कामे केली. युवकांचे विकासाभिमुख राजकारणाकडे लक्ष असल्याने ती करावी लागतील. यावेळी भगवान काटे, जि.प. सदस्य युवराज पाटील, भय्या माने, कनिष्ठ अभियंता गणेश गायकवाड, राहुल हेरवाडे, शिवाजी लगारे, आदींची भाषणे झाली.कार्यक्रमास अविनाश मगदूम, सरपंच युवराज पाटील, उपसरपंच आत्माराम लगारे, संजय हेगडे, पं.स.चे उपसभापती रमेश तोडकर, अरुण पाटील, शेखर पाटील, शिवानंद माळी, कॉन्ट्रक्टर उमेश पंचारिया, जालंदर लगारे, संजय चितारी, कनिष्ठ अभियंता जी. बी. पाटील. यु. डी. कोकणे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मीकांत पाटील, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण मुदाण्णा यांनी केले. सुरेश डोणे यांनी सुञसंचलन केले. संजय खोत यांनी आभार मानले.गाडीमध्ये कुदळ, फावडे घेऊनच फिरा : मुश्रीफगाडीमध्ये कुदळ व फावडे ठेऊन फिरावे म्हणजे कोठेही उद्घाटन करायचे झाले की ‘हाण कुदळ’ असे मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना उद्देशून म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचंड प्रेम केले असे सांगत तालुक्याच्या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून एकही पैसा दिला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.