घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निखिल आणि विनायक हे निपाणीहून आपल्या गावी मोटारसायकल (एमएच-०९ एचटी ६७६५)वरून जात होते. सोनगे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने ते मोटारकारवर जाऊन धडकले. यामध्ये निखिल हा जाग्यावरच बेशुद्ध झाला. दोघांनाही मुरगूडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच निखिलचे लग्न झाले होते. त्याचे वडील प्राथमिक शिक्षक असून तो एकुलता मुलगा होता. अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.
गतिरोधक, हेल्मेट असते तर....
सोनगे गावानजीक गतिरोधक केलेला नाही. तसेच, ते बुलेटवर असल्याने त्यांचा वेगही खूप होता. अपघातानंतर निखिलच्या कानातून रक्त वाहत होते. त्यामुळे हेल्मेट असते तर त्याचा जीव वाचला असता; तसेच नशीब बलवत्तर म्हणूनच इतक्या भीषण अपघातानंतरही विनायकचा जीव वाचल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.